ETV Bharat / state

विजेच्या धक्क्याने वळण येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू - Walan village latest news

‌दादासाहेब बाळासाहेब जगताप हे शुक्रवारी सकाळी शेतातील मोटार सुरू करण्यासाठी विहिरीवर गेले होते. त्यावेळी मोटरच्या स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. मोटर चालू करण्यासाठी स्टार्टरला हात लावताच त्यांना विजेचा धक्का बसला आणि ते बेशुद्ध होऊन तिथेच पडले.

विजेच्या धक्क्याने वळण येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

author img

By

Published : Aug 22, 2020, 1:41 PM IST

राहुरी (अहमदनगर) - तालुक्यातील वळण येथील तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दादासाहेब जगताप (वय 30) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

‌दादासाहेब बाळासाहेब जगताप हे शुक्रवारी सकाळी शेतातील मोटार सुरू करण्यासाठी विहिरीवर गेले होते. त्यावेळी मोटरच्या स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. मोटर चालू करण्यासाठी स्टार्टरला हात लावताच त्यांना विजेचा धक्का बसला आणि ते बेशुद्ध होऊन तिथेच पडले. काही वेळाने त्यांच्या घरचे शेतात आले असता हा प्रकार समोर आला. त्यावेळी कुटुंबीयांनी तत्काळ दादासाहेब यांना उपचारासाठी राहुरीच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दादासाहेब यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन छोटी मुले असा परिवार आहे.

या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच दादासाहेब यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आयुब शेख करत आहेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.