शिर्डी - उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा मनमानी कारभार त्याची दहशत सर्व जगाला माहिती आहे. त्याची सरळ अमेरिकेला दिलेली धमकी असो किंवा कोरोना काळात चीनला उडवून देण्याची धमकी असो, तो नेहमीच चर्चेत असतो. त्याच्याच सारखा हुबेहूब दिसणारा नेवासा तालुक्यातील सोनई येथील अभिषेक बाळासाहेब बारहाते सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याला सोनईचा किम जोंग देखील म्हणतात.
असा आहे अभिषेकचा प्रवास
सध्या गावी आलेला अभिषेक बाराहाते रस्त्यावर फिरतो आहे. त्याला पाहिल्यानंतर उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचीच आठवण येते. एकाच चेहर्याचे सात मिळते-जुळते चेहरे निर्माण करण्याची किमया निसर्गाने करुन दाखवली आहे. मात्र, या वास्तवाची अनुभूती सोनईकरांना येत असून अभिषेकमुळे सोनई गावाचे नाव अवघ्या महाराष्ट्रात गाजत आहे. अभिषेक हुबेहूब उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्यासारखाच दिसतो. त्याचे कपडे अन् हेअर स्टाईलही त्याने त्याच्या सारखीच केली आहे. सध्या महाराष्ट्राभर प्रेक्षकांना खळखळुन हसविणाऱ्या 'चला हवा येवू द्या' या वरील वर्हाड निघालय अमेरिकाला या कार्यक्रामात किम जोगच पात्र साकरत आहे. त्यामुळेही तो चांगलाच चर्चेत आला आहे. छोट्याशा सोनई सारख्या खेडेगावात अभिषेक शालेय नाटकात सहभाग घेत त्यानंतर त्याला चला हवा येऊन द्या, प्लटफार्म दिला आणि त्याची किम जोग म्हणून ओळख पक्की झाली.
परिसरात एकच चर्चा
2018 मध्ये चला हवा येऊन द्या यामध्ये काम सुरु केले. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. त्यामुळे त्याला सोनई परीसरातही आता मित्र परीवार किम जोग म्हणूनच बोलवतात. आपला मित्र एका राष्ट्राच्या अध्यक्षा सारखा दिसतो आणि तो आता मोठा कलाकरही झाल्याचा अभिमान मित्रांना आहे. किम जोंग या पात्रात अभिषेक बारहातेकडून डॉ. निलेश साबळे यांनी काम करुन घेतल होत. दिसायला हुबेहूब आणि त्यात नगरी भाषेचा विनोदी पद्धतीने केलला वापर, यामुळे महाराष्ट्राचा हा किम जोंग कमी वेळातच व्हायरल झाला. अभिषेक पुन्हा भेटीला आला असून, 'वर्हाड निघालं अमेरिकेला' या नव्या पर्वात अभिषेकला डॉ. साबळे यांनी पुन्हा किम जोंगच्या भूमिकेची जबाबदारी दिली आहे. येत्या काळात पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.