ETV Bharat / state

कर्जतमध्ये रंगला कुस्त्यांचा फड; स्पर्धेत राज्यासह देशातील नामवंत मल्लांचा समावेश

author img

By

Published : Aug 18, 2019, 10:08 PM IST

या अगोदर सृजनच्या माध्यमातून कर्जत येथे क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आदी प्रकारच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु कुस्ती स्पर्धा ही प्रथमच भरवण्यात आली आहे.

रोहित पवार

अहमदनगर- कर्जतचा कुस्ती आखाडा हा राज्यातील प्रसिद्ध आखाडा म्हणून ओळखला जातो. या आखाड्यात राज्यासह देशातील तसेच कर्जत व जामखेड मधील 200 पेक्षा जास्त मल्ल सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी दिली.

सृजन संस्था आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा २०१९ चा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालया समोरील मैदानावर ही कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे. या अगोदर सृजनच्या माध्यमातून कर्जत येथे क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आदी प्रकारच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु कुस्ती स्पर्धा ही प्रथमच भरवण्यात आली आहे. रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कर्जत मध्ये रंगला कुस्त्यांचा फड

कर्जत येथील भव्य कुस्ती आखाड्यामध्ये राज्यातील व देशातील अनेक नामांकित मल्ल उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारत विरुद्ध इराण, महाराष्ट्र विरुद्ध पंजाब ,अशा एकापेक्षा एक कुस्त्या पाहण्याची सुवर्णसंधी कुस्ती शौकीनांना मिळणार आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कुस्त्या पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कुस्ती आखाड्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्र संचालन शंकर पुजारी हे करत आहेत.

Intro:अहमदनगर- कर्जत मधे आयोजित कुस्ती स्पर्धेत देश-राज्यातील नामवंत कुस्तीगीरांचा समावेश..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_kusti_turnament_vij_7204297

कर्जत मधे आयोजित कुस्ती स्पर्धेत देश-राज्यातील नामवंत कुस्तीगीरांचा समावेश..

अहमदनगर- कर्जतचा कुस्ती आखाडा हा राज्यातील प्रसिद्ध आखाडा असून या आखाड्यामध्ये राज्यासह देशातील तसेच कर्जत व जामखेड मधील 200 पेक्षा जास्त पैलवान सहभागी झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी दिली.
सृजन संस्था आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा व मैदानी आखाडा २०१९ या कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या हस्ते कर्जच्या दादा पाटील महाविद्यालय समोरील मैदानावरती संपन्न झाला. रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की या अगोदर सृजनच्या माध्यमातून कर्जत येथे क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आदी प्रकारच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु कुस्ती स्पर्धा ही प्रथमच भरवण्यात आली आहे.
कर्जत येथील भव्य कुस्ती आखाड्यामध्ये राज्यातील व देशातील अनेक नामांकित मल्ल उपस्थित असून यावेळी भारत विरुद्ध इराण, महाराष्ट्र विरुद्ध पंजाब ,अशा एकापेक्षा एक कुस्त्या पाहण्याची सुवर्णसंधी जामखेड कर्जत मधील प्रेक्षकांना मिळणार आहे. उद्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या दिमाखदार कुस्ती आखाड्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्र संचालन शंकर पुजारी हे करत आहेत.

-राजेन्द्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- कर्जत मधे आयोजित कुस्ती स्पर्धेत देश-राज्यातील नामवंत कुस्तीगीरांचा समावेश..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.