ETV Bharat / state

महिला दिन विशेष : शिक्षण नाही म्हणून 'ती'ने जीवनाची गाडी थांबवली नाही; तर... - womens day special story ahmednagar

निलीमा खराडे या त्यांच्या या कामात सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत बिझी असतात. शिक्षण नाही म्हणून नोकरी मिळत नसल्याचे पाहून निलीमा यांनी रिक्षा, चारचाकी चालवण्याचा निर्णय घेतला. स्त्री असूनही त्यांनी या प्रश्नांचे उत्तरे शोधली. त्यांनी सुरुवातीच्या काळात पिठाच्या चक्कीवर काम केले. जे पुरुष करू शकतात ते एक स्त्री पण नक्कीच करू शकते, असा त्यांना विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना पण त्यांनी आतापासूनच आपल्याला जे येते ते शिकवण्याचा प्रयत्न ठेवला आहे.

महिला दिन विशेष : शिक्षण नाही म्हणून 'ती'ने जीवनाची गाडी थांबवली नाही; तर...

author img

By

Published : Mar 8, 2020, 5:16 PM IST

Updated : Mar 8, 2020, 5:42 PM IST

अहमदनगर - जीवनात काहीतरी केलेच पाहिजे हे तिचे ध्येय होते. मात्र, शिक्षण आड येत होते. जास्त शिक्षण नसल्याने सरकारी-खासगी कार्यालयात नोकरी मिळणार नव्हती. मात्र, ती थांबली नाही. तिने पिठाची चक्की चालवली. कधी ती रिक्षा चालवताना दिसते. तर कधी वेग-वेगळ्या क्लाइन्ट्ससाठी ती कारवर बदली चालक म्हणून दिसते. अशा अष्टपैलू महिलेचे नाव आहे निलीमा मनीष खराडे. आंतराराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने 'दामिनी' या मालिकेच्या माध्यमातून घेतलेला हा विशेष आढावा.

महिला दिन विशेष : शिक्षण नाही म्हणून 'ती'ने जीवनाची गाडी थांबवली नाही; तर...

निलिमा खराडे या त्यांच्या या कामात सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत बिझी असतात. शिक्षण नाही म्हणून नोकरी मिळत नसल्याचे पाहून निलीमा यांनी रिक्षा, चारचाकी चालवण्याचा निर्णय घेतला. स्त्री असूनही त्यांनी या प्रश्नांचे उत्तरे शोधली. त्यांनी सुरुवातीच्या काळात पिठाच्या चक्कीवर काम केले. जे पुरुष करू शकतात ते एक स्त्री पण नक्कीच करू शकते, असा त्यांना विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना पण त्यांनी आतापासूनच आपल्याला जे येते ते शिकवण्याचा प्रयत्न ठेवला आहे.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय महिला दिवस : बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

महिलांनी मनातून अबलेची भावना काढून टाकल्यास समाजही त्यांच्या मदतीला असतो, असा निलीमा यांचा अनुभव आहे. बदली ड्रायव्हर म्हणून रात्री-बेरात्री त्या चारचाकी कार चालवण्यास भीती नाहीत. परिसरातील नागरिकांनाही निलीमा यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान आहे. जागतिक महिला दिनाच्या या दिनानिमित्ताने स्त्रियांचा सन्मान होत असतो, आणि तो केलाही पाहिजे. मात्र, कामानिमित्ताने वर्षभर समाजात वावरतानाही हाच सन्मान आणि त्यांची सुरक्षितता घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे. तरच महिला दिन साजरा करण्याचे खरे औचित्य असणार आहे. निलीमा यांच्या कार्याला 'ईटीव्ही भारत'चा सलाम..!!

Last Updated : Mar 8, 2020, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.