ETV Bharat / state

Ahmednagar Crime: धक्कादायक! पती-पत्नीमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद; आईनेच केली पाच महिन्याच्या बाळाची हत्या - immoral relations dispute

पती-पत्नीमध्ये अनैतिक संबंधावरून वाद होत असल्याच्या रागातून महिलेने आपल्याच पाच महिन्याच्या बाळाची हत्या केली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने तक्रार दिली असता आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामधील कारवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

Ahmednagar Crime
पाच महिन्याच्या बाळाची हत्या
author img

By

Published : Feb 20, 2023, 6:44 PM IST

अहमदनगर: जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात कारवाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादातून एका महिलेने आपल्याच पाच महिन्याच्या बाळाची हत्या केली आहे. तसेच या महिलेने दोन अज्ञात इसमांनी बाळाला पळवून नेल्याचा बनाव देखील केला आहे. महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरोधात खुनाचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या घटनेने कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी महिला ताब्यात : पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली. बनाव करणाऱ्या आईवरच पोलीसांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली असता तिनेच बाळाची हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी मयत बाळाच्या आईला ताब्यात घेतले आहे. सुरूवातील चौकशी दरम्यान आरोपी महिलेने पोलिसांची दिशाभूल करत बाळाला पळवून नेल्याचा बनाव केला.

पोटच्याच बाळाची केली हत्या : सूरज आणि गायत्री माळी हे दाम्पत्य कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात राहतात. मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे दाम्पत्य करीत होते. पती सूरज पत्नी गायत्रीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. गायत्रीने रागाच्या भरात आपल्या शिवम नावाच्या पाच महिने सात दिवसाच्या बाळाची हत्या केली. बाळाची हत्या केल्यानंतर काही अज्ञात लोकांनी येऊन मुलाला पळवून नेल्याचा बनाव आरोपी महिलेने केला.

रागाच्या भरात हत्या केल्याची कबूली: बाळाच्या नातेवाईकांनी त्यात दोन इसमांचा परिसरात शोध घेतला. परंतु ते मिळून आले नसल्याने त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांना बाळाची आई गायत्रीवर संशय आल्याने त्यादृष्टीने तपास केला असता तिने घडलेला प्रकार सांगितला. आणि रोजच्या भांडणाच्या कारणावरून रागाच्या भरात स्वतःच्या बाळाची हत्या केल्याचे सांगितले.

पोलिसांचा तपास सुरू : घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत बाळाचे वडील सूरज शंकर माळी वय 23 रा. दंडवते वस्ती , कारवाडी, कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयत मुलाची आई गायत्री सूरज माळी हिच्या विरुद्ध गुन्हा र नं 96/23 भादंवी कलम 302,201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधीक तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा: Mumbai Crime: 14 वर्षीय मुलीवर केले वारंवार अत्याचार; गर्ल्स हॉस्टेलच्या पादरीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.