ETV Bharat / state

कौतुकास्पद..! वीरपत्नीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजाराची मदत - अहमदनगर

हुतात्मा सुनील वलटे यांच्या पत्नी मंगला वलटे यांनी मदत निधी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांकडे जमा केली आहे. सुनील वल्टे हे भारतीय लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. मागच्या वर्षी जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमध्ये झालेल्या एका कारवाईत ते हुतात्मा झाले होते.

cm relief fund
सहायता निधी देताना वीर पत्नी मंगला वलटे
author img

By

Published : Apr 6, 2020, 3:04 PM IST

अहमदनगर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागातील नागरिक मुख्यमंत्री सहायता निधीस मदत देत आहे. विशेष म्हणजे, कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका येथील हुतात्मा जवान सुनील वलटे यांच्या पत्नीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५१ हजार रुपयांची मदत दिली आहे.

माहिती देताना वीर पत्नी मंगला वलटे

हुतात्मा सुनील वलटे यांच्या पत्नी मंगला वलटे यांनी मदत निधी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांकडे जमा केली आहे. सुनील वल्टे हे भारतीय लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. मागच्या वर्षी जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमध्ये झालेल्या एका कारवाईत ते हुतात्मा झाले होते. या संकटकाळी सामाजिक जबाबदारी म्हणून मंगला यांनी दिलेली मदत खरच कौतुकास्पद असून ती इतारांसाठी प्रेरणादायी आहे.

हेही वाचा- कौतुकास्पद..! दोन आजी-माजी राजपत्रित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस दिली मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.