अहमदनगर - कोरोनाने मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात 23 वर्षीय भावजय आणि तिची 19 महिन्यांची चिमुकली दुःखात लोटले गेले. या कुटुंबातील समाधान याने मनाची हिम्मत करत चिमुकल्या पुतणीचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. चुलते. वडील यांच्या सहविचाराने भावजयीबरोबर लग्नगाठ बांधली. अकोले तालुक्यात दिर भाऊजाईचा सामाजिक आदर्श घालून देणारा विवाह नुकताच संपन्न झाला आहे.
दीराने बांधली भावजयीशी लग्नगाठ अकोले तालुक्यातील ढोकरी येथील निलेश शेटे वय 31 वर्षीय यांचे 14 ऑगस्ट 2021 ला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले ते हिरपाडा, जव्हार येथे आश्रमशाळेत सेवेत होते. आश्रमशाळेतील मुले , शिक्षक कोरोना बाधित झाले. त्यात नीलेश यांनाही कोरोनाची बाधा झाली. कोरोनातून सावरत असतानाच त्यांच्या मेंदूत गाठ झाली आणि नाशिक येथे उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना 19 महिन्याची एक मुलगीही आहे. तरुण पत्नी पुनम अवघी 23 वर्षांची असताना कोरोनाने पतीला हिरावले. त्यामुळे पुनम समोर जीवनाचा सर्वात मोठा प्रश्न उभा होता. गावातील ज्येष्ठ व्यक्ती माधव तिटमे यांनी पुढाकार घेतला आणि लहान दिर समाधान याच्याशी विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वांशी चर्चा झाल्यानंतर समाजाची सर्व बंधने झुगारून अखेर दोघांचा विवाह पार पडला. या निर्णयामुळे जीवनातील आनंद गमावलेली पुनमही आनंदी झाली.पुतणीचे स्विकारले पालकत्व सामाजिक वस्तुपाठ
अकोले म्हाळादेवी येथील खंडोबा मंदिर प्रांगणात हा लग्न सोहळा पार पडला. विधवा वहिनीबरोबर दिराने बांधली लग्नगाठ घरातील समाधान कारभारी शेटे या 26 वर्षाय तरुणाने वहिनीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे चुलते सीताराम शेटे , सामाजिक कार्यकर्ते माधव तिटमे , भाऊ मंगेश शेटे , पुनमचे माहेरकडील टाहाकारी येथील एखंडे कुटुंब यांनी सकारात्मक विचार केला. विधवा मुलीची व सर्व कुटुंबाची मानसिकता तयार केली. म्हाळादेवी येथील खंडोबा मंदिर प्रांगणात कोरोना नियम पाळत हा लग्न सोहळा पार पडला. दिराने लग्न करून समाजात भान जपले.
विधवांचा प्रश्न गंभीरकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याने तरुण विधवांचा प्रश्न गंभीर झाला आहे. आपल्या समाजात पुरुष सहजपणे दुसरे लग्न करू शकतो. परंतु तरुण स्त्रीला जातीची, समाजाची, घराण्याच्या परंपरेची मुले असण्याची कारणे देऊन असा निर्णय घेण्यापासून रोखले जाते. त्यामुळे ही घटना या सामाजिक बंधनांना झुगारून देणारी महत्त्वपूर्ण घटना आहे. म्हणून तिचे स्वागत केले पाहिजे व समाजातील सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील असा विवाह करू इच्छिणाऱ्या महिलांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन यावेळी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णी यांनी केले. कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती विधवा महिलांसाठी गेली अनेक महिने काम करत आहे. त्यामुळे या अनुकरणीय निर्णयाचे कौतुक करण्यासाठी समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी ढोकरी येथे जाऊन त्या कुटुंबाचा व नवदाम्पत्याचा सत्कार केला.हेही वाचा - Porn Film Case : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात शर्लिन चोप्राला दिलासा.. सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन