अहमदनगर : स्मशानभूमीत लग्नसोहळा (Wedding Ceremony In Cemetery) ही गोष्ट कोणाच्या सहजासहजी पचनी पडत नाही. मात्र कोपरगाव शहरातील अमरधाम येथे नागरिकांनी एक आगळा वेगळा लग्नसोहळा (different wedding) अनुभवयास मिळाला आहे. कोपरगाव शहरातील अमरधामची देखरेख व मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे शिवराम जाधव यांची कन्या पल्लवी हीचा विवाह आंध्रप्रदेश येथील नवरा मुलगा रमेश यलप्पा कडमचे याच्याशी विवाह ठरला. आता जाधव यांचे घर आंगणच स्मशानभूमी. मग आपल्या आंगनातच मुलीचा विवाह अर्थात अमरधाममध्येच विधिवतपणे मोठ्या उत्साहात विवाह सोहळा संपन्न झाला. (Latest news from Ahmednagar)
नवरदेवाची डीजेच्या तालावर वरात : स्मशानभूमीतील जाधव परिवाराच्या वतीने वऱ्हाडी मंडळींचे दणक्यात स्वागत करण्यात आले. लग्नाचा मंडप, वऱ्हाडींची गर्दी, वाजंत्री, फटाक्याची आतिषबाजी, मंगलाष्टके आणि जेवणाच्या पंगती असे अमरधामचे दृश्य होते. अमरधाममधून नवरदेवाची डीजेच्या तालावर वाजत गाजत आवाजात वरात काढण्यात आली होती. डीजेच्या तालावर यावेळी अनेकांनी ठेकही धरला होता. त्यानंतर भव्य मंडपात पल्लवी आणि रमेशने सात जन्माच्या आणा भाका घेतल्या. ज्या अमरधाममध्ये दुःखाचे अश्रू कायम वाहत असतात आज तेथे अक्षदारूपी आनंदाचे जरे वाहत होते. थोड्क्यात जीवनाचा शेवट ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आज नवीन संसाराची, नव्या आयुष्याची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या अमरधाम मधील विवाहाची मात्र सर्वत्र चर्चा रंगली होती.