शिर्डी ( अहमदनगर ) - शिर्डीत गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाच्या साचलेल्या पाण्याचे थैमान Heavy rains in Shirdi सुरू आहे. साईनगरीतील अनेक घरात आजही पाणी साचलेले waterlog in houses in shirdi आहे. आता या पाण्याला दुर्गंधी सुटली असून रोगराई पसरण्याची शक्यता बळावली infection Possibility in Shirdi आहे. दरम्यान पंधरा दिवस उलटुनही ओढे नाले साफ करण्याचे महसूल मंत्र्यांनी अश्वासन दिले होते. ते हवेत विरले आहे.
घराघरांत पाणी साठले - शिर्डीसाठी उभारलेल्या काकडी विमानतळ कोर्हाळे आणि इतर भागातुन शिर्डीकडे येणारे पाणी शिर्डीच्या शिवाच्या ओढ्यापर्यंत पुर्णपणे पोहचत नसल्याने हे पाणी शहरातील हेडगेवारनगर रिंगरोड रूग्णालय या भागात पसरले आहे. अनेक घराघरांत आजही पाणी साठलेले आहे. त्यात अनेक ठिकाणी असलेले बेसमेंट पुर्णपणे पाण्याने भरलेले आहेत. त्याला आता दुर्गंधी सुटली आहे. ओढ्यातुन सध्या पाणी वहात असले तरी अद्यापही लक्ष्मीनगरच्या पुढील भागातील अरुंद पुल व हॉटेलची अतीक्रमणे पंधरा दिवसानंतर आजही जैसे थे आहेत. पंचतारांकित हॉटेल सुरु आहेत. धनाड्या लोक गारेगार हवेत बसताय मात्र दुसरीकडे शिर्डीतील अनेक व्यवसायिकांची दुकाने पाणी साचल्याने उघडलेली नाहीये. अतिक्रमणे करणारे बिनधास्त आणि सर्नवसामान्याचे हाल अशी परसास्थित शिर्डीतील आहे.
साईनाथ रुग्णालयात पाणी शिरले - गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डीत पावसाने घातलेल्या थैमानाने साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात पाणी शिरले Water entered in Sainath Hospita होते. यावेळी तातडीने साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना साईबाबा संस्थानच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते. दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊसाचे पाणी रुग्णालयात शिरले असल्याने गेल्या 12 दिवसांपासून साईबाबा संस्थानचे साईनाथ रुग्णालय बंद ठेवण्यात आले Shirdi Sainath Hospital closed आहे. कर्मचाऱ्यांकडून साफ सफाईचे काम सुरू असून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसात पुन्हा रुग्णासाठी साईनाथ रुग्णालय सज्ज होणार आहे. तोपर्यंत रुग्णांनी साईबाबा संस्थानच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये जावून उपचार घ्यावेत असे आवाहन साईबाबा संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.