अहदनगर - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज आहे. शिर्डी मतदारसंघातही आज सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. शिर्डीमध्ये शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे याच्यांसह अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही रिंगणात आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान आणि अन्य १६ उमेदवारही रिंगणात उभे आहेत. मात्र, खरी लढत लोखंडे-कांबळे-वाकचौरे, अशी मानली जात आहे.
LIVE UPDATES -
- ६.०० - सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिर्डी लोकसभा मतदार संघात ६०.४५ टक्के मतदान झाले.
- ५.०० - सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिर्डी लोकसभा मतदार संघात ५६.१९ टक्के मतदान झाले.
- ३.०० - दुपारी ३ वाजेपर्यंत शिर्डी लोकसभा मतदार संघात ४५.४८ टक्के मतदान झाले आहे.
- 2.00 pm - शिर्डी लोकसभा मतदारसंघात २ वाजेपर्यंत ३४.७९ टक्के मतदान
- 01.00 pm -शिर्डी लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.५६ टक्के मतदान
- 12.10 pm - संगमनेर तालुक्यापासून 45 कि.मी असणाऱ्या भोजदरी गावा अंतर्गत पेमरेवाडी येथील नागरिकांनी टाकला मतदानावर बहिष्कार.
- 11.20 am - शिर्डी लोकसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.६८ टक्के मतदान
- 09.20 am - शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.२९ टक्के मतदान.
- 09.00 am - राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरीषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, सुजय विखे पाटील, पत्नी धनश्री विखे पाटील यांनी लोणी येथे केले मतदान.
- 07.00 am - शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात.