ETV Bharat / state

रांजणगाव देशमुख गावात सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी; संतप्त ग्रामस्थांचा निर्णय - जलवाहिन्या

उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे स्थानिक सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी तीनतेरा वाजवले. त्यामुळे संतप्त झालेल्या रांजणगाव देशमुख येथील ग्रामस्थांनी कासारे पाठोपाठ सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोपरगावसह उत्तर नगर जिल्ह्यातील गाव व तालुक्यातील नेत्यांत खळबळ उडाली आहे.

रांजणगाव देशमुख गावात सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी
author img

By

Published : Jun 12, 2019, 5:31 PM IST

अहमदनगर - उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे स्थानिक सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी तीनतेरा वाजवले. त्यामुळे संतप्त झालेल्या रांजणगाव देशमुख येथील ग्रामस्थांनी कासारे पाठोपाठ सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोपरगावसह उत्तर नगर जिल्ह्यातील गाव व तालुक्यातील नेत्यांत खळबळ उडाली आहे.

रांजणगाव देशमुख गावात सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी

उत्तर नगर जिल्ह्यातील ७ तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना निळवंडे प्रकल्प वरदान ठरणार आहे. या कामास निधी मिळण्याचा मार्ग निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते विक्रांत रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जाऊन विधिज्ञ अजित काळे यांच्यामार्फत मोकळा केला आहे.

केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने उच्च न्यायालयासमोर २८ फेब्रुवारी २०१९ रोजी २२३२.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे इतिवृत्त दाखल केले आहे. काही राजकीय उपद्रवी नेत्यांनी तापी खोऱ्यात वळविण्यात आलेला १५८ कोटींचा निधी औरंगाबाद खंडपीठामार्फत कृती समितीने थांबविलेला आहे. याखेरीज लाभक्षेत्राबाहेर शिर्डी, कोपरगाव शहरांना नियमबाह्य रीतीने मंजूर केलेल्या जलवाहिन्यांना स्थगिती दिली आहे. मात्र, अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधीस पुढे करून उत्तरेतील काही राजकीय शुक्राचार्यांनी तालुक्यातील ० ते २८ किमीतील काम अवैधरित्या बंद केले आहे. असे करून त्यांनी दुष्काळी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरु केले आहे.

सदरचे पाणी राजरोस दारू कारखान्यांना एकमताने वापरले जात असून अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी आर्थिक फायद्यासाठी त्यांना पाठीशी घालत आहेत. प्रस्तावित लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र पाण्यासाठी आत्महत्या करीत असल्याचे वास्तवदर्शी चित्र आहे. अकोले तालुक्यातील आमदार पिचड यांनी कालव्यांचे काम २० डिसेंबर रोजी बेकायदा बंद केला होता. मात्र, तरीही वरीष्ठ राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने जिल्हास्तरीय अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना राजकीय अभय देत आहेत.

कृती समितीच्या कार्यकर्त्यानी ५ फेब्रुवारी रोजी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा अर्ज देऊनही त्याकडे पोलीस प्रशासनाने कानाडोळा केला आहे. प्रवरा काठचे नेते आता सत्तेत सामील झाले असतानाही एकमेकांवर दोषारोप करून स्वतःची बोटे सोडू पाहत आहे व आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारत आहे. तर संगमनेरमधील लोकप्रतिनिधी काम बंद केलेल्या आमदार पिचड यांना सोडून अकोलेतील निष्पाप असबंध शेतकऱ्यांच्या नावाने शिमगा करून जनतेच्या डोळ्यात धूळ झोकत आहे.

राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी २३ जानेवारी रोजी नाशिक आयुक्त राजाराम माने यांच्या पातळीवर काम चालू करण्यासाठी बैठक घेऊन सहा महिने उलटले आहे. तथापि आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अद्यापही त्यांना राज्य राखीव पोलीस बलाचे कार्यालय सापडले नाही. त्यामुळे त्यांनी केवळ बैठकीचा सोपस्कार करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांत मोठा असंतोष आहे.

कासारे गावातील शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या या नादाणपणाला वैतागले होते. त्यामुळे त्यांनी फेब्रुवारीत निळवंडे कालवा कृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करून पहिली चपराक लगावली होती. त्याची दखल राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी घेऊन देशभर उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांची कलंक शोभा मिरवली होती. आजही राज्य व देश पातळीवरील वृत्त वाहिन्या कासारे गावात ठाण मांडून आहेत. मात्र, तरीही या निगरगठ्ठ पुढाऱ्यांना त्याचे काहीही वाटलेले नसून त्यांनी काम चालू करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाही. केवळ शोगिरी करण्यातच ते समाधान मानत आहेत.

शेतकरी आत्महत्या करत असताना ही राजकीय मंडळी त्याचे रूपांतर अकस्मात मृत्युत करत आहेत. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील तरुण शेतकऱ्यांनी २६ मे रोजी कोपरगावच्या दुष्काळी दौऱ्यानिमित्त आलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधीस पिटाळून लावले होते. त्यावेळीच ही नाराजी दिसून आली होती. त्यामुळे तरुण काहीतरी निर्णय घेण्याचा मानसिकतेपर्यंत आले होते.

निळवंडे धरणावर या नेत्यांनी अनेक वर्षे फक्त राजकारणच केले. काम अंतिम टप्यात असतानाही यावर योग्य तोडगा निघत नाही. त्यामुळे आता पुढाऱ्यांना गावबंदी करावी व येणाऱ्या मतदानावरही बहीष्कार टाकावा, असा निर्णय रांजणगाव देशमुखच्या विशेष ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. यावेळी सर्वांनी हनुमान मंदीरात शपथ घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान निळवंडे प्रकल्पाचे स्थानिक सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी तीनतेरा वाजवल्याने संतप्त झालेल्या रांजणगाव देशमुख येथील ग्रामस्थानी कासारे पाठोपाठ सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गाव बंदीचा ठराव केला आहे....आयोजित ग्रामसभेत घेतल्याने कोपरगावसह उत्तर नगर जिल्ह्यातील गाव व तालुक्यातील नेत्यांत खळबळ उडाली आहे....

VO_ उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे कामास निधी मिळण्याचा मार्ग निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते विक्रांत रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जाऊन विधिज्ञ अजित काळे यांच्या मार्फत मोकळा केला आहे.केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने उच्च न्यायालयासमोर २८ फेब्रुवारी २०१९ रोजी २२३२.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे इतिवृत्त दाखल केले आहे.काही राजकीय उपद्रवी नेत्यांनी तापी खोऱ्यात वळविण्यात आलेला १५८ कोटींचा निधी औरंगाबाद खंडपीठामार्फत कृती समितीने थांबविलेला आहे.या खेरीज लाभक्षेत्राबाहेर शिर्डी,कोपरगाव शहरांना नियमबाह्य रीतीने मंजूर केलेल्या जलवाहिन्याना स्थगिती दिली आहे.मात्र अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधीस पुढे करून उत्तरेतील काही राजकीय शुक्राचार्यांनी अकोले तालुक्यातील ० ते २८ की .मी.तील काम अवैधरित्या बंद करून दुष्काळी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरु चालवले आहे.सदरचे पाणी राजरोस दारू कारखान्यांना एकमताने वापरले जात असून अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी आर्थिक फायद्यासाठी त्यांना पाठीशी घालत असून प्रस्तावित लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र पाण्यासाठी आत्महत्या करीत असल्याचे वास्तवदर्शी चित्र आहे.अकोले तालुक्यातील आ. पिचड यांनी कालव्यांचे काम २० डिसेंम्बर रोजी बेकायदा बंद करूनही वरीष्ठ राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने जिल्हास्तरीय अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना राजकिय अभय देत आहे.कृती समितीच्या कार्यकर्त्यानी ५ फेब्रुवारी रोजी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा अर्ज देऊनही त्याकडे पोलीस प्रशासनाने कानाडोळा केला आहे.प्रवरा काठचे नेते आता सत्तेत सामील झाले असतानाही एकमेकांवर दोषारोप करून स्वतःची बोटे सोडू पाहत आहे व आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारत आहे.तर संगमनेर मधील लोकप्रतिनिधी काम ज्यांनी बंद केले त्या आ. पिचड यांना सोडुन अकोलेतील निष्पाप असबंध शेतकऱ्यांच्या नावाने शिमगा करून जनतेच्या डोळ्यात धूळ झोकत आहे.राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी २३ जानेवारी रोजी नाशिक आयुक्त राजाराम माने यांच्या पातळीवर काम चालू करण्यासाठी बैठक घेऊन सहा महिने उलटले आहे.तत्रापहि आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.अद्यापही त्यांना राज्य राखीव पोलीस बलाचे कार्यालय सापडले नाही.त्यामुळे त्यांनी केवळ बैठकीचा सोपस्कार करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम जलसंपदा राज्यमंत्र्यांनी केल्याचे दिसत आहे.त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांत मोठा असंतोष आहे.कासारे गावातील शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या या नादाणपणाला वैतागून फेब्रुवारीत निळवंडे कालवा कृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करून पहिली चपराक लगावली होती.त्याची दखल राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी घेऊन देशभर उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांची कलंक शोभा मिरवली होती.आजही राज्य व देश पातळीवरील वृत्त वाहिन्या कासारे गावात ठाण मांडून आहेत.मात्र तरीही या निगरगठ्ठ पुढाऱ्यांना त्याचे काहीही वाटलेले नाही व .त्यानी काम चालू करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाही शोगिरी करण्यातच ते समाधान मानत आहे.शेतकरी आत्महत्या करत असताना हि राजकीय मंडळी त्याचे रूपांतर अकस्मात मृत्युत करत आहेत.त्यामुळे जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील तरुण शेतकरी अस्वस्थ होते त्यांनी २६ मे रोजी कोपरगावच्या दुष्काळी दौऱ्यानिमित्त आलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधीस पिटाळून लावले होते.त्यावेळीच हि नाराजी दिसून आली होती.त्यामुळे तरुण काहीतरी निर्णय घेण्याचा मानसिकतेपर्यंत आले होते.निळवंडे धरणावर या नेत्यांनी केवळ अनेक वर्षे फक्त राजकारणच केले गेले.काम अंतिम टप्यात असतांनाही यावर योग्य तोडगा निघत नाही त्यामुळे आता गावात पुढा-यांना गावबंदी करावी व येणा-या मतदानावरही बहीष्कार टाकावा असा निर्णय रांजणगाव देशमुखच्या विशेष ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला.सर्वानी हनुमान मंदीरात शपथ घेऊन या निर्णयावर केले शिक्कामोर्तब.....

VO_ निळवंडे धरणाचे काम पुर्ण झाले आसुन कालव्यांची कामे अपुर्ण आहेत.182 गावांचा निळवंडे धरणाचे पाणी हा जिवन मरणाचा प्रश्न आहे.सातत्याने लाभधारक शेतकरी पाण्याची मागणी करत आहे.मात्र आश्वासनापलीकडे काही झालेच नाही.आता काम होण्याची चिन्हे दिसत आसतांना त्यालाही काहीजण अडचण निर्माण करत आहेत.आता कालव्यांची कामे तातडीने करुन लाभधारक शेतक-याच्या शेतात पाणी द्यावे अशी मागणी शेतक-यांची आहे.या प्रश्नासाठी संगमनेर तालुक्यातील कासारे यांनी यापुर्वीच पुढा-यांना गाव बंदी केली आहे.कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथेही मंगळवारी विशेष ग्रामसभा घेऊन यापुढे सर्वच राजकिय पक्षांच्या पुढा-यांना गावबंदी करण्याचा व येणा-या मतदानावर बहीष्कार टाकण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे....Body:MH_AHM_Shirdi Leader Village Ban_12 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Leader Village Ban_12 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.