शिर्डी - महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. विजया रहाटकर या गुरुवारी रात्री साईबाबांच्या शिर्डीत आल्या असून साईबाबांची रात्रीची शेजआरतीला त्यांनी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी रहाटकर यांचा शाल, साईंची मूर्ती देऊन सन्मान केला.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही गुरुवारी रात्री साईबाबांच्या शेजआरतीला हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून समाधीवर फुलांचा हार तसेच चादर अर्पण केली आहे. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी मंत्री कदम यांचा शल, साईंची मूर्ती देऊन सन्मान केला. साई संस्थानने प्लास्टिक बंदीची चांगली मोहीम सुरु केली असून साई मंदिर परिसरात भाविक प्लास्टिक घेऊन आल्यानंतर साई संस्थानचे सुरक्षा रक्षक त्यांच्याकडील प्लास्टिक काढून घेत आहेत. तसेच मंदिर परिसरात संस्थानकडून लावण्यात आलेले फलकांबद्दल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी साई संस्थानचे कौतुक केले.