ETV Bharat / state

पाण्यासाठी नगराध्यक्षांनी तोडले कालव्याच्या फाटकाचे कुलूप - पाणीवाटप

नाशिकवरुन गोदावरी कालव्यातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. मात्र, कोपरगाव नगर पालिकेचे साठवण तळे न भरताच हे पाणी वैजापूरच्या दिशेने गेल्याने कोपरगावकरांमधे संतापाची लाट पसरली होती.

कालव्याच्या फाटकाचे कुलूप तोडताना नगराध्यक्ष
author img

By

Published : May 19, 2019, 1:58 PM IST

अहमदनगर - पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव नगर पालिकेचे साठवण तळे न भरताच कालव्याचे दरवाजे बंद केले. यामुळे संतप्त झालेल्या कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडने यांनी मंगळवारी कालव्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडले.

कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर नाशिकवरुन गोदावरी कालव्यातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. मात्र, कोपरगाव नगर पालिकेचे साठवण तळे न भरताच हे पाणी वैजापूरच्या दिशेने गेल्याने कोपरगावकरांमधे संतापाची लाट पसरली आहे. यावेळी वहाडने यांनी कालव्याच्या दरवाजाच्याचे कुलूप तोडून फाटक उघडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांनी वहाडने यांची समजूत काढत १९ मे रोजी पूर्ण तळे भरून देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर वहाडने यांनी सहकार्याची भूमिका घेत माघार घेतली आणि लेखी आश्वासनाची मागणी केली. यावेळी शहरातील नागरिकांनी तळ्यावर गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वहाडनेंना समजावल्यानंतर पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी ते फाटक परत लावून घेतले.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR _पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी कोपरगाव नगर पालिकेचे साठवण तळे न भरताच काल्व्याचे दरवाजे बंद केल्याने पिण्याच्या पाण्यासाठी संतत्प झालेल्या कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष वहाडने यांनी मंगळवारी कालव्याच्या दरवाज्याचा कुलूप तोडला....

VO _ कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असुन बर्याच राजकिय घडामोडी नंतर नाशिक वरुन गोदावरीकालव्यातून पिण्यासाठी पाण्याचा आवर्तन सोडण्यात आल,कोपरगाव नगर पालिकेचे साठवण तळे न भरताच हे पाणी वैजापुरच्या दिशेने गेल्याने कोपरगावकरांमधे संतापाची लाट पसरली, यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडने यांनी काल्व्याचे दरवाजाचे कुलूप तोडुन फाटक उघडल्याने काही काळ तणावाच वातावरण निर्माण झाल होतं.यावेळी नगराध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया दिली...

BITE_नगराध्यक्ष विजय वहाडने

VO _यावेळी पाटबंधारे खात्याचे अधिकार्यांनी वहाडने यांची समजुत काढत 19 मे ला पुर्ण तळे भरुन देऊ असे आश्वासन दिल्या नंतर वहाडने यांनी सहकार्याची भुमिका घेत माघार घेतली व अश्वासनाची लेखी मिळावी अशी मागणी केली.यावेळी शहरातील नागरिकानी तळ्यावर गर्दी केली होती,कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.त्यानंतर पाट बंधारेच्या अधिकार्यांनी ते फाटक परत लावुन घेतले आहे....Body:14 May Shirdi Kopargaon Water ProblemConclusion:14 May Shirdi Kopargaon Water Problem
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.