ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकांनिमित्त रोहित पवार अन् राम शिंदेंमध्ये रंगले वाक् युद्ध - रोहित पवार ग्रामपंचायत निवडणूक सहभाग

नगर जिल्ह्यात चौदा तालुक्यांतील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत तालुक्यात 56 तर जामखेड तालुक्यातील 49, अशा एकशे पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी ३० लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे.

Rohit Pawar and Ram Shinde
रोहित पवार आणि राम शिंदे
author img

By

Published : Jan 2, 2021, 10:40 AM IST

Updated : Jan 2, 2021, 11:50 AM IST

अहमदनगर : कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती गत-टत विसरून बिनविरोध निवडणूक पार पाडतील, अशा ग्रामपंचायतींना ३० लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेला माजीमंत्री राम शिंदे यांनी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाने आमिष दाखवणाऱ्या घोषणेची गंभीर दखल घ्यावी व रोहित पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिंदेंनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांनिमित्त रोहित पवार अन् राम शिंदे आमने-सामने

लोकशाही प्रक्रिया मोडीत काढू नका -

रोहित पवारांनी सध्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे. राम शिंदे गटापुढे त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. दोन्ही नेत्यांनी जास्तीतजास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात कशा राहतील याचे नियोजन केले आहे. आमदार निधीचा वापर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी करण्याचे पवारांचे नियोजन आहे. त्यांनी ज्या ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक करतील त्यांना तीस लाख रुपयांची घोषणा रोहित यांनी केली. त्यांच्या घोषणेला राम शिंदेंनी आव्हान देत निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. अशा पद्धतीने पैशांचे आमिष दाखवले तर धनदांडक्यांच्या हातात सत्ता एकवटून लोकशाही प्रक्रियेला काहीच महत्व राहणार नाही. उद्या तुम्ही पंचायत समित्या, जिल्हा परिषद आदी निवडणुकांमध्ये असेच आमिष दाखवून सत्ता हस्तगत करणार का? असा प्रश्न राम शिंदे यांनी विचारत नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांना माझा मुद्दा कळला नाही-

आमदार रोहित पवारांनी राम शिंदेंना उत्तर दिले आहे. त्यांना माझा मुद्दा समजला नसल्याची टीका रोहित यांनी केली. बिनविरोध निवडणुकीमध्ये सर्व गटांना संधी असून उमेदवारांचा वाचलेला पैसा शेवटी गावाच्या विकासासाठीच कामाला येणार आहे. जामखेड-कर्जतमधील काही नेत्यांचा दबाव वापरून ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

Last Updated : Jan 2, 2021, 11:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.