ETV Bharat / state

वंचित बहुजन आघाडीकडून सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी - ELECTION

आव्हाड म्हणाले, की बहुजन समाजाला प्रकाश आंबेडकरांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. इतर सर्व पक्ष जातीयवादी आणि धनदांडग्यांच्या पाठीशी असताना प्रकाश आंबेडकरांनी सामान्य जनतेसाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली.

बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड
author img

By

Published : Mar 23, 2019, 11:55 AM IST

Updated : Mar 23, 2019, 12:01 PM IST

अहमदनगर - वंचित बहुजन आघाडीने आज अहमदनगरची उमेदवारी जाहीर केली. येथून माजी अधिकारी सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडी विजय संपादित करेल असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला

सुधाकर आव्हाड हे पाथर्डी तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी अनेक वर्षे सरकारी नोकरीत अधिकारी पदावर काम केले आहे. भारीप बहुजन महासंघ आणि एमआयएमने संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यावेळी आव्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.

आव्हाड म्हणाले, की बहुजन समाजाला प्रकाश आंबेडकरांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. इतर सर्व पक्ष जातीयवादी आणि धनदांडग्यांच्या पाठीशी असताना प्रकाश आंबेडकरांनी सामान्य जनतेसाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. त्यामुळे आमच्या समोर कितीही मोठ्या शक्ती असल्या तरी जनता आम्हालाच साथ देईल. यावेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, दिलीप साळवे, सुनील शिंदे, नितीन घोडके, जीवन कांबळे आदी उपस्थित होते.

Intro:अहमदनगर- वंचित बहुजन आघाडीकडून सुधाकर आव्हाड उमेदवार. दिग्गज विखे-जगतापांना दिले आव्हान..

Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- वंचित बहुजन आघाडीकडून सुधाकर आव्हाड उमेदवार. दिग्गज विखे-जगतापांना दिले आव्हान..

अहमदनगर- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन वंचित बहुजन विकास आघाडीने सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी देत विखे-जगताप यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे. आव्हाड हे पाथर्डी तालुक्यातील असून सरकारी नोकरीत अधिकारी पदावर राहिलेले आहेत. भारिप-बहुजन, एमआयएम पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकारपरिषदेत आव्हाड यांच्या उमेदवारी बद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी भारिप-भुजनचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, दिलीप साळवे, सुनील शिंदे, नितीन घोडके, जीवन कांबळे आदी उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे नंतर बहुजन समाजाला प्रकाश आंबेडकरांकडून अपेक्षा-
-यावेळी बोलताना वंचित आघाडीचे उमेदवार आव्हाड यांनी बहुजन वंचित भटक्या समाजाला स्व.गोपीनाथ मुंडे नंतर आता प्रकाश आंबेडकरां कडून अपेक्षा आहेत. इतर सर्व पक्ष जातीयवादी आणि धनदांडग्यांच्या पाठीशी असताना प्रकाश आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी वंचित आघाडीची थापना केली आहे. त्यामुळे आमच्या समोर कितीही मोठ्या शक्ती निवडणुकीत उभ्या असल्या तरी बहुसंख्येने असलेली सामान्य जनता आमच्या पाठीशी राहून विजयी करील असे सांगितले. भारिप-बहुजनचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनीही वंचित आघाडीचे नगर दक्षिण आणि शिर्डी या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- वंचित बहुजन आघाडीकडून सुधाकर आव्हाड उमेदवार. दिग्गज विखे-जगतापांना दिले आव्हान..
Last Updated : Mar 23, 2019, 12:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.