ETV Bharat / state

अहमदनगर; आमदार मोनिका राजळे निष्क्रिय, वंचितकडून ठिय्या आंदोलन

गेल्या सहा वर्षांपासून आमदार राजळे या जनतेचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, त्यांचा प्रशासनावर वचक नाही, तसेच त्या सामान्य जनतेसाठी नव्हे ठेकेदार यांच्याशी हितसंबंध ठेवून आहेत, असा आरोप यावेळी वंचितचे प्रा.किसन चव्हाण यांनी केला.

ahmednagar
वंचितचे राजळे यांच्या गावी ठिय्या आंदोलन
author img

By

Published : Aug 4, 2020, 9:19 PM IST

अहमदनगर - शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदातसंघाच्या भाजप आमदार मोनिका राजळे या निष्क्रिय आहेत. कोरोनाच्या संकटकाळात त्या जनतेच्या प्रश्नांकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप करत मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राजळे यांच्या मूळगावी कासार पिंपळगाव येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनास मज्जाव करत आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.

वंचितचे आमदार मोनिका राजळे यांच्या गावी ठिय्या आंदोलन

गेल्या सहा वर्षांपासून आमदार राजळे या जनतेचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, त्यांचा प्रशासनावर वचक नाही, तसेच त्या सामान्य जनतेसाठी नव्हे ठेकेदार यांच्याशी हितसंबंध ठेवून आहेत, असा आरोप यावेळी वंचितचे प्रा.किसन चव्हाण यांनी केला. यावेळी आमदार राजळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन तक्रारी सोडवल्या जातील असे आश्वासन दिले.

येत्या चार-पाच दिवसात तक्रारी सोडवल्या नाहीत तर पुन्हा आमदार राजळे यांच्या निवासस्थाना समोर मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

पोलिसांचा दुजाभाव -

वंचितचे कार्यकर्ते आज आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यास निघाले असताना त्यांना वाटेतच पोलिसांनी अडवत गुन्हे दाखल केले, असा आरोप प्रा.चव्हाण यांनी केला. दूध आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर पोलिसांनी कुठलेही गुन्हे दाखल केले नाहीत, मात्र जनतेच्या प्रश्नावर आम्ही लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास जात असताना पोलिसांनी आम्हाला वाटेतच अडवले, हा दुजाभाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.