शिर्डी (अहमदनगर) - ईडीची (सक्त वसुली संचनालय) नोटीस आल्यानंतर संजय राऊंत यांनी 'आ देखे जरा किसमे कितना दम', असे ट्वीट केले होते. त्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवी अंदाजात 'हम भी दिखायेंगे हम भी नही कुछ कम', असे उत्तर दिले आहे. सोमवारी (दि. 28 डिसें.) शिर्डीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर महाराष्ट्रातील कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे परत आमच्याकडे आले तर त्यांना दोन वर्षे मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करणार
महाविकास आघाडीत मतभेत आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकू शकत नाही. उद्धव ठाकरे जर पुन्हा एनडीएत आले तर त्यांना दोन वर्षे मुख्यमंत्री करण्यासाठी भूमिका घेण्याबाबत मी वरिष्ठांकडे पाठपुरावा करेल. तसेच उद्धव ठाकरे यांनी जास्त दिवस महाविकास आघाडीसोबत राहिल्यास शिवसेनेतही फुट पडण्याची शक्यता असल्याचे रामदास आठवले यांनी शिर्डीत म्हणाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये आरपीआयसाठी 10 जागांची मागणी भाजपकडे करणार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर निवडणूक लढवणार आहोत. भाजपने आम्हाला पश्चिम बंगालमध्ये 10 जागा तरी द्यावा, अशी मागणी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे करणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहे.
हेही वाचा - आमदार निलेश लंकेच्या 'बिनविरोध'ला 'नवनागापूर'मधे खोडा!!
हेही वाचा - शिर्डीत भाविकांची मांदियाळी; दोन दिवसात 40 हजार भाविकांनी घेतले साई समाधीचे दर्शन