ETV Bharat / state

Uddhav Thackeray Shirdi Tour : उद्धव ठाकरे शिर्डी दौऱ्यावर; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जाणार थेट बांधावर - शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पहाणी

राज्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांपुढं दुष्काळाचं मोठ्ठं संकट उभं राहिलं आहे. शिर्डी तालुक्यातील काही गावातील पीकं करपली आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत.

Uddhav Thackeray Shirdi Tour
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 12:57 PM IST

उद्धव ठाकरे शिर्डी दौऱ्यावर

शिर्डी Uddhav Thackeray Shirdi Tour : राज्यात ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानं शेतकऱ्यांवर दुष्काळचं सावट उभं राहिलं आहे. शेतकऱ्यांची नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शिर्डी दौऱ्यावर जाणार आहेत. शिर्डी जवळील काही गावांना उद्धव ठाकरे भेट देणार असून तेथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पहाणी करणार आहेत.

उद्धव ठाकरे पुणतांब्याला देणार भेट : उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत. उद्धव ठाकरे आज सकाळी अकरा वाजता मुंबईहून विमानानं शिर्डी विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर लगेचच शिर्डी विमातळाजवळ असलेल्या काकडी गावातील विलास सोनवणे या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ते पिकांची पाहणी करणार आहेत. आज दुपारपर्यंत उद्धव ठाकरे हे संगमनेर तालुक्यातील वरझडी, राहाता तालुक्यातील केलवड, कोऱ्हाळे या गावात भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे राज्यात शेतकरी संपाची पहिली हाक देणाऱ्या पुणतांबा गावातील काही शेताची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

शिर्डीत घेणार साई दर्शन : शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करुन आल्यानंतर उद्धव ठाकरे शिर्डीत साई दर्शन घेणार आहेत. त्या अगोदर शिर्डीतील शासकीय विश्रामगृहावर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे कोणावर हल्लाबोल करतात, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काय दिलासा देतात, याकडं शेतकरी बांधवांचं लक्ष लागलं आहे. पत्रकार परिषद संपवून उद्धव ठाकरे साई मंदिरात जाऊन साई दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा शेतकरी नुकसान पाहणी दौरा संपवणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.

शिर्डी तालुक्यात दुष्काळसदृष्य स्थिती : शिर्डी तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांची पिकं करपली आहेत. त्यामुळे बळीराजावर पुन्हा संकट ओढवलं आहे. पावसानं दडी मारल्यानं पिकाला पाणी देता येणं शक्य नाही. त्यामुळे पुणतांबा, वरझडी, केलवड, कोऱ्हाळे या गावातील शेतकरी हतबल झाले आहेत. शेतातील पीक करपत असून शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर येत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. Jalna Maratha Protest : लोकांच्या केसाला हात लावला तर..; उद्धव ठाकरेंचा राज्यसरकारला इशारा
  2. Uddhav Thackeray on Jalna Lathicharge : जालना लाठीचार्ज प्रकरणी उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'एक फुल अन् दोन हाफ...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.