ETV Bharat / state

शिर्डीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ, गारठून मृत्यू झाल्याचा संशय

दोन व्यक्तींचे मृतदेह रस्त्याच्याकडेला आढळल्याने खळबळ उडाली आहे. मागील दोन दिवसांपासून शिर्डीत कोसळत असलेला पाऊस आणि जाणवत असलेल्या थंडीमुळे या दोन्ही व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून दुसऱ्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 2, 2021, 7:07 PM IST

Updated : Dec 4, 2021, 7:13 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - दोन व्यक्तींचे मृतदेह रस्त्याच्याकडेला आढळल्याने खळबळ उडाली आहे. मागील दोन दिवसांपासून शिर्डीत कोसळत असलेला पाऊस आणि जाणवत असलेल्या थंडीमुळे या दोन्ही व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून दुसऱ्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत.

शिर्डीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ

शिर्डीतील नगर-मनमाड महामार्गावर एक आणि कणकुरी रोडवर लागत असलेल्या ओढ्याजवळ एक अशा दोन ठिकाणी दोन व्यक्तीचे मृतदेह आढळल्याची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले. एका मृतदेहाजवळ काही आधार कार्ड व दवाखान्याची काही कागदपत्रे आढळली असून त्यावरून एकनाथ हाटे (रा. कल्याण), अशी एकाची ओळख पटली आहे.

शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली असून एकनाथ हाटे यांच्याकडे मिळवून आलेल्या कागदपत्रावरून त्यांचा कुटूंबियांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरा व्यक्ती हा शिर्डीत भिक्षेकरू म्हणून राहत असल्याच दिसून आले. मागील दोन दिवसांपासून शिर्डीत थंडी आणि रिमझीम पाऊस सुसू असल्याने शिर्डीतील भिक्षेकरुंना निवारा नसल्याने ते थंडीत गारठून जात आहेत. यातील वयोवृद्ध भिक्षेकरुंना शिर्डीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते अनाथालयात नेऊन तिथे त्यांची व्यवस्था करत आहेत.

हे ही वाचा - Sheeps Died - संगमनेरमध्ये थंडी आणि पावसाने 14 मेंढ्याचा बळी

Last Updated : Dec 4, 2021, 7:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.