अहमदनगर- जिल्ह्यात मंगळवारी 20 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. 5 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 20 कोरोना रुग्णांमध्ये अकोले, संगमनेर, श्रीगोंदा, लोणी राहाता, नगर शहर येथील व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 172वर पोहोचली आहे.
अकोले तालुक्यात 7 कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्यामध्ये दोन पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. जवळे येथील 48 आणि 24 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. वाघापूर येथील 32 आणि 40 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय पुरुषास कोरोना संसर्ग झाला आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात होते तालुक्यातील बोरी येथील साठ वर्षीय महिला देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे.
संगमनेर तालुक्यातील डिग्रज, मालुंजा येथील 21 आणि 45 वर्षीय महिला बाधित असल्याचे स्पष्ट झाले. श्रीगोंदा तालुक्यातील कांडेगाव येथील एक 75 वर्षीय महिला देखील कोरोनाबाधित झाली आहे. संगमनेर शहरातील 36 वर्षाची महिला आणि अडीच वर्षे वयाचा मुलगा कोरोनाबाधित आहे. लोणी, राहाता येथील एक 56 वर्षीय व्यक्ती, नगर शहरातील स्टेशन रोड येथील 33 वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे.
नगर शहरातील मार्केट यार्ड मधील सोमवारी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील 3 जण आणि याच परिसरातील 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. माळीवाडा येथील 42 वर्षीय पुरुष आणि केडगाव येथील 29 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील एक, संगमनेर येथील एक, मसने फाटा पारनेर येथील एक आणि नगर तालुक्यातील दोन अशा एकूण पाच रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.