ETV Bharat / state

'बुलाती है मगर जाने का नही..' तृप्ती देसाई यांचं इंदोरीकर आणि समर्थकांना आव्हान

author img

By

Published : Feb 18, 2020, 12:33 PM IST

इंदोरीकर महाराज आणि समर्थकाना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी समाज माध्यमातून आव्हान दिले आहे. 'बुलाती है मगर जाने का नही..' इंदोरीकर महाराज किंवा त्यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची हिंमत दाखवावी, असे ही त्यांनी पोस्टमध्ये लिहीले आहे.

Trupti Desai has written to social media and appealed to Indurikar Maharaj and supporters.
'बुलाती है मगर जाने का नही..' तृप्ती देसाई यांचं इंदुरकर महाराज आणि समर्थकांना आव्हान

अहमदनगर- इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांवर तातडीने गुन्हा दाखल कराव अशी मागणी कलेली आहे. या मागणीनंतर तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई अहमदनगरमध्ये येत आहेत. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमध्ये इंदोरीकर महाराज किंवा त्यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची हिम्मत दाखवावी आव्हान दिले आहे. त्यांनी पोस्टमध्ये पुढे 'बुलाती है मगर आने का नही... असेही लिहिले आहे.

इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केलेली आहे. या मागणीनंतर तृप्ती देसाई यांच्यावर थेट इंदोरीकर महाराजांनी कोणतेही वक्तव्य केले नसले तरीही महाराजांच्या असंख्य समर्थकांकडून सोशल माध्यमांमधून तृप्ती देसाई यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. देसाई यांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे थेट तक्रार करून आपण एक महिला असताना महाराजांच्या सांगण्यावरून त्यांचे समर्थक आपल्यावर अगदी खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी करत आहेत. समाज माध्यमांमधून माझ्याबद्दल चुकीच्या पोस्ट व्हायरल करत आहेत. तसेच भिंगार येथील एक कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांनीही आपल्याबद्दल अनेक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून आपल्यावर खालच्या पातळीची टीका केलेली आहे अशी तक्रार केली आहे.

देसाई यांनी मंगळवारी आपण अहमदनगर येथे येत असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहोत असे जाहीर केले आहे. आज मंगळवारी सकाळी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट प्रसिद्ध करत आपण अहमदनगरमध्ये येत आहोत आपण कायद्याच्या आधारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे, त्यामुळे इंदोरीकर महाराज किंवा त्यांच्या समर्थकांनी यांनीही पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची हिम्मत दाखवावी असे आव्हान तृप्ती देसाई यांनी देताना 'बुलाती है मगर आने का नही..' असे म्हणत इंदोरीकर महाराज आणि त्यांच्या समर्थकांना एक प्रकारे आव्हान दिले आहे.

दुसरीकडे कधी शिवसेना तर कधी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यां सांगणाऱ्या कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांनीही आज सकाळी एक आपली व्हिडीओ क्लिप व्हायरल केली असून तृप्ती देसाई यांनी नगर शहरात येऊनच दाखवावे, त्यांचा 'योग्य तो' समाचार घेणार असल्याचे आव्हान दिलं आहे. एकूणच इंदोरीकर महाराज यांचं पीसीपीएनडीटी कायद्याच्या अनुषंगाने बेकादेशीर असलेल्या वक्तव्यावरुन आता इंदोरीकर समर्थक आणि विरोधक असा सामना सोशल माध्यमा सोबतच रस्त्यावरही दिसणार असल्याचे एकूण चित्र आहे. एकूणच याबाबत अहमदनगर जिल्हा पोलिसांनी याबाबत खबरदारी घेतली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.