ETV Bharat / state

केडगावमध्ये ट्रकने महिलेला चिरडले; स्थानिकांचा रस्ता रोको

author img

By

Published : Jan 11, 2020, 8:29 AM IST

नगर-पुणे महामार्गावर एका भरधाव ट्रकने दोन महिलांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली. संतप्त स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

केडगावमध्ये ट्रकने महिलेला चिरडले
केडगावमध्ये ट्रकने महिलेला चिरडले

अहमदनगर - केडगाव येथे नगर-पुणे महामार्गावर एका भरधाव ट्रकने दोन महिलांना चिरडले. यामध्ये शांताबाई काळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर, दुसरी महिला जखमी झाली. या अपघातानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

केडगावमध्ये ट्रकने महिलेला चिरडले

शांताबाई आणि त्यांच्यासोबत असलेली महिला या दोघी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. त्यावेळी अचानक वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. शांताबाई ट्रक खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या वाहनाला अपघात, आमदारांसह तिघे जखमी..
अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी शहराच्या बाहेरून बायपास रस्त्याची निर्मिती केलेली असताना ही वाहने शहरात येतातच कशी, असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. आंदोलनामुळे नगर-पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. संतप्त जमावाने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकची तोडफोड केली. कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालक उस्मान कासम सय्यद याला ताब्यात घेतले आहे.

Intro:अहमदनगर - केडगावमध्ये ट्रकने महिलेला चिरडले..स्थानिकांचा रस्ता रोको..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_kedgaon_road_accident_pkg_7204297

अहमदनगर - केडगावमध्ये ट्रकने महिलेला चिरडले..स्थानिकांचा रस्ता रोको..

अहमदनगर- नगर - पुणे महामार्गावर केडगाव येथे  ट्रकने महिलेला चिरडले. शांताबाई काळे या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे.शांताबाई आणि याच्या बरोबर असलेली जखमी महिला या रस्त्याकडेला उभ्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. शांताबाई हया ट्रक खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शांताबाई त्यांच्याबरोबर असलेली दुसरी महिला ही गंभीर जखमी झाली असुन त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. जड वाहने शहरातून येतातच कसे, असा प्रश्न उपस्थित केला. आंदोलनामुळे नगर-पुणे रोडवर वाहतूक कोंडी झाली होती.

बाईट - स्थानिक नागरीक

आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या भावना तीव्र होत्या. संतप्त जमावाने अपघाताला कारणीभूत ठरले ल्या ट्रकची तोडफोड केली. कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन. पोलिसांनी ट्रक चालक उस्मान कासम सय्यद पोलिसांनी ट्रक चालक उस्मान कासम सय्यद  याला ताब्यात घेतले आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर - केडगावमध्ये ट्रकने महिलेला चिरडले..स्थानिकांचा रस्ता रोको..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.