शिर्डी (अहमदनगर) - परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही आहे. राज्य सरकारने पगारवाढ देऊन सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. ( ST Workers Strike ) त्यामुळे हा संप मिटावा ही विनंती घेऊन आज (शनिवारी) परिवहन मंत्री अनिल परब शिर्डीत पोहोचले. ( Transport Minister Anil Parab in Shirdi ) मंत्री परब यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच हा संप लवकर मिटावा, यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली.
परिवहनमंत्र्यांचे आवाहन -
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साईबाबांच्या आरतीनंतर साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी परब यांचा सत्कार केला. साईबाबांच्या दर्शनासाठी मी नेहमीच येत असतो आणि आज साईबाबांचा माध्यान्ह आरतीला उपस्थित राहण्याचा योगही आला असल्याचं यावेळी परब म्हणाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप बदल बोलतांना परबांनी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर लवकर रुजू व्हावं असेही आवाहन यावेळी केले आहे.
हेही वाचा - ST Workers strike : एसटीचे 98 वर्षीय पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांनी संपाबद्दल व्यक्त केली नाराजी