ETV Bharat / state

Shirdi Saibaba Aarti : साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाताय.. आता आरतीची वेळ बदलली, 'या' वेळेत होणार साईंची आरती - मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला ( Sai Baba Darshan Shirdi ) जाणाऱ्या भाविकांसाठी शिर्डीहून महत्वाची बातमी आली आहे. शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेने ( Shri Sai Baba Sansthan Shirdi ) पहाटेची काकड आरती तसेच रात्रीच्या शेजारतीची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला ( Sai Baba Aarti Timing Changed ) आहे. महाशिवरात्रीपासून ( MahaShivratri 2022 ) हा वेळेचा बदल करण्यात येणार आहे.

साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाताय.. आता आरतीची वेळ बदलली, 'या' वेळेत होणार साईंची आरती

author img

By

Published : Feb 22, 2022, 7:41 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) : शिर्डी साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या व्‍यवस्‍थापन मंडळाने ( Shri Sai Baba Sansthan Shirdi ) पूर्वीप्रमाणे साईबाबांच्या काकड आरतीची वेळ सकाळी 5.15 वाजता व शेजारतीची वेळ रात्री 10 वाजता करण्‍याचा निर्णय घेतला ( Sai Baba Aarti Timing Changed ) आहे. नुकत्‍याच झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेतला असून, दिनांक 1 मार्च रोजी महाशिवरात्रीच्‍या ( MahaShivratri 2022 ) औचित्‍यावर साईंच्या आरतीच्या वेळेत बदल करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत ( IAS Bhagyashree Banayat ) यांनी दिली.

साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाताय.. आता आरतीची वेळ बदलली, 'या' वेळेत होणार साईंची आरती

2008 मध्ये झाला होता बदल

बानायत म्‍हणाल्‍या की, साईबाबांच्‍या समाधी मंदिरात प्रथेप्रमाणे विविध पूजा-अर्चा नियमित केल्‍या जातात. यामध्‍ये प्रामुख्‍याने काकड आरती, माध्‍यान्‍ह आरती, धुपारती व शेजारती ह्या आरत्‍या विधींचा समावेश असून, सर्व आरत्‍यांना साईभक्‍त व ग्रामस्‍थ मोठ्या संखेने हजेरी लावतात. तसेच या आरत्‍यांचे अनन्‍यसाधारण महत्‍व असून, या आरत्‍या साईबाबा समाधी मंदिरात आजतागायत अविरतपणे सुरु आहेत. सन 2008 गुढीपाडव्‍यापासून साईबाबांच्‍या समाधी मं‍दिरातील साईंच्या काकड आरतीच्‍या वेळेत बदल करुन पहाटे 4.30 वाजता व शेजारती रात्री 10.30 वाजता करण्‍याचा निर्णय तात्‍कालीन व्‍यवस्‍थापन मंडळाने घेतला होता. त्‍यानुसार दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेतही काहीसा बदल करण्‍यात आला होता. परंतु साईभक्‍त व ग्रामस्‍थांकडून साईंची काकड आरती व शेजारतीच्‍या वेळेत पुर्वीप्रमाणे बदल करण्‍यात यावा, अशी मागणी वारंवार करण्‍यात येत होती. त्‍यानुसार संस्‍थानच्या व्‍यवस्‍थापन मं‍डळाचे अध्‍यक्ष आशुतोष काळे, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व विश्‍वस्‍त मंडळाने दिनांक 24 जानेवारीच्‍या सभेत साईंच्या काकड आरती व शेजारतीच्‍या वेळेत बदल करण्‍याचा सर्वानुमते निर्णय घेतला.

'असे' आहे वेळापत्रक

काकड आरती व शेजारती या आरत्‍यांच्‍या वेळेत बदल होत असल्‍यामुळे साईबाबा मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत ही काहीसा बदल करण्‍यात येत ( Shirdi Sai Baba Aarti New Schedule ) असून, यामध्‍ये पहाटे 4.45 वाजता समाधी मंदिर उघडुन पहाटे 5 वाजता भुपाळी रेकॉर्ड सुरु होईल. पहाटे 5.15 वाजता काकड आरती, सकाळी 5.50 वाजता साईंचे मंगलस्‍नान व त्‍यानंतर शिर्डी माझे पंढरपुर ही आरती होईल. सकाळी 6.25 वाजता दर्शनास प्रारंभ होईल. दुपारी 12 वाजता माध्‍यान्‍ह आरती होईल. सुर्यास्‍ताचे वेळी धुपारती होईल. रात्री 10 वाजता शेजारती होऊन रात्री 10.45 वाजता समाधी मंदिर बंद करण्‍यात येईल. उपरोक्‍तप्रमाणे समाधी मंदिरातील आरत्‍यांच्‍या व दैनंदिनी कार्यक्रमांचे वेळेत बदल करण्‍यात येणार असून, हे बदल दिनांक 1 मार्च 2022 पासुन सुरु होतील, याची भाविकांनी व ग्रामस्‍थांनी नोंद घ्‍यावी, असेही बानायत यांनी सां‍गितले. तसेच या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्‍यावा व सर्व साईभक्‍तांनी व शिर्डी ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन संस्‍थान व्‍यवस्‍थापन मंडळाचे अध्‍यक्ष, विश्‍वस्‍त व संस्‍थान प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.