ETV Bharat / state

विहिरीचे खोदकाम करताना क्रेन कोसळून तीन मजुरांचा मृत्यू, अकोले तालुक्यातील घटना

दुपारचे जेवण आटोपल्यानंतर बाळासाहेब शेळके, गणेश कदम आणि नवनाथ शिंदे  हे तिघे क्रेनच्या साहाय्याने खाली विहिरीत उतरत होते. यावेळी वायर तुटुन हे तिघेही विहिरीत जोरात कोसळले. विहिरीतील खडकावर आपटून  बाळासाहेब शेळके व गणेश कदम यांचा जागीच मृत्यू झाला तर नवनाथ शिंदे यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

author img

By

Published : Jun 17, 2019, 8:53 PM IST

Updated : Jun 17, 2019, 9:21 PM IST

तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर - अकोले तालुक्यातील देवठाण येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेन तुटून अंगावर कोसळल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी तीन मजुरांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बाळासाहेब शेळके (रा. देवठाण), गणेश कदम (रा.हिवरगाव आंबरे) आणि नवनाथ शिंदे (रा.वडगाव लांडगा) असे मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. रामहरी दगडू जोर्वेकर यांच्या मालकीच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते.

विहिरीचे खोदकाम करताना क्रेन कोसळून तीन मजुरांचा मृत्यू

दुपारचे जेवण आटोपल्यानंतर बाळासाहेब शेळके, गणेश कदम आणि नवनाथ शिंदे हे तिघे क्रेनच्या साहाय्याने खाली विहिरीत उतरत होते. यावेळी वायर तुटुन हे तिघेही विहिरीत जोरात कोसळले. विहिरीतील खडकावर आपटून बाळासाहेब शेळके व गणेश कदम यांचा जागीच मृत्यू झाला तर नवनाथ शिंदे यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

या घटनेतील दोन्ही मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, तर नवनाथ शिंदे याचा रस्त्यात असतानाच मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेहही ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच अकोले ग्रामीण रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने संगमनेर व अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे. विहीर मालक आणि मृत्युमुखी पडलेले तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. मृत बाळासाहेब शेळके हा पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके यांचे चुलत बंधू होते. या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_अकोले तालुक्यातील देवठाण गावात विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेन तुटून तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे..अतिशय मन सुन्न करणारी ही घटना घडलीय....

VO_अकोले देवठाण शिवारातील रामहरी दगडू जोर्वेकर यांच्या मालकीच्या विहीरीत हे काम सुरू होते दुपारचे जेवण आटोपल्यानंतर बाळासाहेब शेळके रा.देवठाण,गणेश कदम रा.हिवरगाव आंबरे आणि नवनाथ शिंदे रा.वडगाव लांडगा हे तिघे क्रेनच्या साहायाने खाली विहिरीत उतरत होते,यावेळी वायररफ तुटुन हे तिघे ही विहिरीत जोरात कोसळले विहिरीतील खडकाचा आणि माडीचा मार लागल्याने बाळासाहेब शेळके गणेश कदम यांचा जागीच मृत्यू झाला तर नवनाथ शिंदे याचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला या घटनेतील दोन्ही मृत व्यक्तींना शव विच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तर नवनाथ शिंदे याचा रस्त्यात असतानाच मृत्यू झाल्याने त्याला ही ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले....या घटनेची माहिती मिळताच अकोले ग्रामीण रुग्णालया बाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेने संगमनेर अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे विहीर मालक आणि मृत्युमुखी पडलेले तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत मयत बाळासाहेब शेळके हा पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके यांचे चुलत बंधू होते..या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.....
Body:MH_AHM_Shirdi 3 Men Death_17 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi 3 Men Death_17 June_MH10010
Last Updated : Jun 17, 2019, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.