ETV Bharat / politics

'आरएसएस'च्या पीचवर यंदा बदल घडणार का?; भाजपा उमेदवार बदलण्याची शक्यता - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. त्या अनुषंगानं राजकीय पक्षांनी विदर्भाकडं फोकस केलाय.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
विधानसभा निवडणूक 2024 (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2024, 5:49 PM IST

Updated : Oct 18, 2024, 6:09 PM IST

नागपूर : शहरातील ६ विधानसभा मतदारसंघापैकी मध्य गपूर विधानसभा क्षेत्र सर्वात गुंतागुंतीचा आणि जुना मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून देखील ओळखला जायचा. २००९ च्या निवडणुकीमध्ये भाजपानं मध्य नागपूर काबीज केलं, तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपाकडेचं आहे.

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात (२०१९ च्या आकडेवारीनुसार) ३ लाख २४ हजार २३३ इतके मतदार असून, त्यात १ लाख ६३ हजार ६३४ पुरुष मतदार आहेत, तर १ लाख ६० हजार ५८८ महिला मतदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत १ लाख ६४ हजार ५११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, त्याची टक्केवारी ५०. ७४ टक्के होती.

भाजपाचे इच्छुक उमेदवार भास्कर पराते (Source - ETV Bharat Reporter)

मध्य नागपूर मतदारसंघात प्रामुख्याने इतवारी, गांधीबाग, तांडापेठ, जागनाथ बुधवारी, मोमीनपूरा आणि महाल यासारखे भाग मोडतात. या भागात सर्वाधिक हलबा हा समाज वास्तव्यास आहे. या शिवाय तेली, कुणबी आणि मुस्लिम मतांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरीही हलबा समाजाची मतं निर्णायक मानले जातात. त्यामुळे मध्य नागपूर मतदारसंघात हलबा समाजाच्या उमेदवारालाचं प्राधान्य दिलं जाईल, अशीचं दाट शक्यता आहे. वर्तमान आमदार विकास कुंभारे हे देखील हलबा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, यावेळी त्यांच्या नावाला भाजपामधून अंतर्गत विरोध होऊ शकतो. त्यामुळे अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी दिली जाईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी बंटी बाबा शेळके यांचं नाव चर्चेत आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती : मध्य' नागपूर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जायची. २००९ ला राजकीय परिस्थिती बदलली आणि पहिल्यांदा भाजपाचे उमेदवार असलेले विकास कुंभारे इथून विजयी झाले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सुद्धा विकास कुंभारे हे निवडून आले आहेत. ते सलग तीनदा मध्य नागपूरचे आमदार म्हणून निर्वाचित झाले आहेत.

विद्यमान आमदारांचा पत्ता कट? : २०१९ च्या निवडणुकीत भाजपा हा मतदारसंघ गमावणार अशी दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, हलबा आणि विणकर समाज भाजपाच्या मागे खंबीरपणे उभा राहिल्याने भाजपाने जागा जिंकली होती. मात्र, यावेळी भाजपाने उमेदवार बदलावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विद्यमान आमदारांच्या विषयी काहीशी नाराजी असून, भाजपानं हलबा समाजाच्या दुसऱ्या उमेदवाराची निवड करावी, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक भास्कर पराते यांनी केली.

२०१९ च्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेले मतं : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार विकास कुंभारे यांनी निसटता विजय मिळवला होता. त्यांना ७५ हजार ६९२ इतकी मतं मिळाली, तर काँग्रेस उमेदवार बंटी शेकळे यांना ७१ हजार ६८४ मतं प्राप्त झाली होती. अवघ्या ४ हजार ०८ मतांनी बंटी शेळके यांचा पराभव झाला होता.

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाची माहिती : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ हा १९६७ मध्ये अस्तित्वात आला. ही जागा १९६७ ते २००४ या काळात काँग्रेसकडं होती. या काळात काँग्रेसचे अनेक नेते विधानसभेत गेले. ज्यामध्ये तीन मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे. एम.जे अग्रवाल, नवलचंद टोकसिया, भाऊसाहेब सुर्वे, मोहम्मद याकूब खान, शौकत रहमान कुरेशी, अनीस अहमद आणि बाजीराव यशवंत नारायण यांच्या नावांचा समावेश आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आले तेव्हा मध्य नागपूरचे आमदार अनीस अहमद यांना मंत्री करण्यात आले होते. या जागेवर २००९ पासून भाजपाचे विकास कुंभारे आमदार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय : भाजपाचा कारभार नागपूरच्या संघ मुख्यालयातुन चालतो, असा आरोप राजकीय पक्ष सातत्यानं करतात. त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय हे मध्य नागपूर मतदारसंघात आहे. या शिवाय सर्वात मोठे व्यावसायिक क्षेत्र, बाजारपेठा या विधानसभा मतदारसंघात आहेत. नागपूरचे राजे भोसले यांचा किल्लाही याच भागात आहे.

मध्य नागपूरच्या समस्या : मध्य नागपूर हे व्यापारी केंद्र असल्यानं नागपूर शहरासह इतर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने लोक येतात, त्यामुळं येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. शहराचा जुना भाग असल्याने रस्ते अगदीचं छोटे असल्याने येथे सतत वाहतुकीची समस्या निर्माण होते. सोबतच ड्रेनेजचाही मोठा प्रश्न आहे. सर्वात मोठा मुद्दा जर असेल तर तो हलबा समाजाच्या आरक्षणाचा आहे. हलबाचा अनुसूचित जमातीत समावेश होतो, पण त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून समाज आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याची मागणी करत आहे.

Last Updated : Oct 18, 2024, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.