अहमदनगर : मोहोळजवळ झालेल्या भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू (three farmers death in Nagar district in accident) झाला. कांदा विकण्यासाठी सोलापूरला जात असताना पिकअप वाहनाचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात कर्ज तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे (three farmers death in accident near Mohol) घडली. हे तिघेही कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी आहेत.
पिकअपचा टायर फुटल्याने दुर्घटना : दत्तू भानुदास शेळके (वय 55), श्रीमलसिंग धोंडीसिंग परदेशी (वय 42) व नितीन बजंगे (वय 35) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. हे तिघेही सोलापुर येथे कांदा विक्रीसाठी पिकअप वाहनातून जात होते. कर्जत-सोलापूर मार्गावर मोहोळजवळ पिकअप गाडीचा अचानक टायर फुटल्याने भरधाव गाडी पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचाही उपचारांपुर्वीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी (Farmers Death in Accident) दिली.
श्रीगोंदानंतर कर्जतवर शोककळा : या घटनेने कोरेगावावर शोककळा पसरली आहे. तीनही शेतकऱ्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी येथील मोटारसायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडकल्याने तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ट्रॉलीला रिफ्लेकटर नसल्याने हा अपघात झाला होता. तर मोहोळ झालेला अपघात हा पिकअपचा टायर फुटल्याने झाला आहे. एकंदरीत कुठेतरी या दोन्ही अपघातात वाहन चालकांचा निष्काळजीपणा दिसून येत असून यात निष्पाप बळी जात (three farmers death in Nagar district) आहे.