अहमदनगर - साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला कालपासून सुरुवात झाली. मंगळवारचा उत्सवाचा दुसरा आणि महत्त्वाचा दिवस आहे. तर, बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता संस्थानच्यावतीने मंगळवारी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साईबाबांच्या शिर्डीतील पुण्यतिथी उत्सवाचा आज (मंगळवारी) मुख्य दिवस आहे. यानिमित्त साईदर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे. साईबाबांची पुण्यतिथी म्हणून तीन दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो. 15 ऑक्टोबर 1918 साली दसऱ्याच्या दिवशी बाबांनी समाधी घेतली होती. त्यामुळे या दिवशी साई बाबांचा पुण्यातिथी उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लाखो भाविक साई समाधीवर आज नतमस्तक होऊन साईंचे स्मरण करतात.
हेही वाचा - शिर्डीत सोमवारपासून चार दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात