अहमदनगर - स्थानिक गुन्हे पथकाने कारवाई करून एकाचवेळी आठ गावठी कट्टे पकडले. श्रीरामपूर शहरातील एका पेट्रोल पंप परिसरात पोलिसांनी छापेमारी ( Police Raid ) करत गावठी कट्टे बनविणाऱ्यांचा अड्डा उद्ध्वस्त करत कारवाई केल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन जणांना जेरबंद ( Three Arrested ) केले आहे. आरोपींकडून आठ गावठी कट्ट्यासह दहा जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
तपासात आणखी माहिती होणार उघड - राहुलसिंग फत्तुसिंग कलानी (वय २५), आकाशसिंग बादलसिंग जुनी (वय २२), अक्षयसिंग तिलकसिंग कलानी (वय २२, सर्व रा. श्रीरामपूर बाजारतळ, गुरुगोविंदसिंग नगर, वॉर्ड नं. ३, ता. श्रीरामपूर) अशी या तीन आरोपींची नावे आहेत. हे गावठी कट्टे कोणाला विकणार होते. तसेच हे कट्टे कुठे बनवले गेले याची माहिती पोलीस तपासात पुढे येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, भिमराज खर्से, शंकर चौधरी, सुरेश माळी, रवि सोनटक्के, मयुर गायकवाड, सागर ससाणे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा - Brother Kills For Property : संपत्तीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाचा खून