ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या रेखा जरे हत्या प्रकरणी तिघे ताब्यात; सुपारी देऊन हत्येचा प्रकार, मास्टरमाईंडबद्दल उत्सुकता - राष्ट्रवादीच्या रेखा जरे हत्या प्रकरण

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री कोल्हापूर येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यातील एकजण केडगाव येथील असल्याने समजते. जरे यांची हत्या सुपारी देऊनच झाल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याचे समजते.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Dec 2, 2020, 3:43 PM IST

अहमदनगर - राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकारी तथा यशस्विनी महिला बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे पाटील (वय 40) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यातील दोघांना नगर जिल्ह्यातील कोल्हार येथून तर एकाला कोल्हापूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. कोल्हापूरमधून ताब्यात घेतलेला संशयित हा नगर शहराजवळील केडगाव येथील असल्याचे समजते, हत्या सुपारी घेऊन केल्याचे समोर येत आहे.

काय आहे प्रकरण -

रेखा जरे पाटील त्यांची आई, मुलगा व महिला बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने, असे सर्वजण मोटारीने पुण्याहून नगरकडे येत होते. शिरूरच्या पुढे निघाल्यावर मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या मोटारीला कट मारला. नंतर मोटारीला ओव्हरटेक करीत पुढे जाऊन दुचाकी आडवी लावली. मोटार थांबल्यानंतर त्यांनी जरे-पाटील यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाची सुरू असतानाच एकाने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. याबाबत सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रधार कोण यावर जिल्ह्यात उत्सुकता -

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री कोल्हापूर येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यातील एकजण केडगाव येथील असल्याने समजते. जरे यांची हत्या सुपारी देऊनच झाल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याचे समजते. आता पोलीस मास्टर-माइंडचा शोध घेत आहेत. मास्टरमाईंडबद्दल जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता असून त्याचे नाव समोर येताच अनेकांना धक्का बसेल असे बोलले जात आहे. पोलिसांनी आपला तपास युद्ध पातळीवर सुरू ठेवला असून संशयित, सूत्रधार याबाबत पूर्ण गुप्तता पाळली आहे. पोलिसांना समोर या हत्येचे कोडे उलगडणे मोठे आव्हान होते, घटनेनंतर चोवीस तासात पोलिसांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला असून अधिकृतपणे जनतेसमोर तो लवकरच येऊ शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.