ETV Bharat / state

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरण : उपचारार्थ रुग्ण महिलेचा मृत्यू, मृतांचा आकडा तेरावर

author img

By

Published : Nov 20, 2021, 9:07 AM IST

शुक्रवारी (19 नोव्हेंबर) ला सायंकाळी गाेदाबाई पोपट ससाणे यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकुण मृत्यूची संख्या १३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणात नेमका काेणाला दाेष द्यायचा हा प्रश्नच आहे. आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणा यांच्यासह सहा जणांना कारवाई केली हाेती. त्यातील चाैघांना अटक झाली. अटक झालेल्या जामीन मंजूर झाला आहे. डाॅ. पाेखरणा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरण
अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरण

अहमदनगर - जिल्हा रूग्णालयातील आगीत शुक्रवारी सायंकाळी तेराव्या रुग्णाचा बळी गेला. गाेदाबाई पाेपट ससाणे (वय ७५ रा. वांगदरी ता. श्रीगाेंदे) यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील काेविड अतिदक्षता विभागाला ६ नाेव्हेंबरला सकाळी आग लागली हाेती. या घटनेच्या दिवशी ११ जणांचा बळी गेला हाेता. त्यानंतर दाेन दिवसापूर्वी बुधवारी(17 नोव्हेंबर) आणखी एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला हाेता. त्यावेळी घटनेतील मृतांची संख्या १२ झाली हाेती. शुक्रवारी तेरावा मृत्यू झाला असू चार रुग्णांवर उपचार सुरू आहे.

अटकेत असलेल्यांना जामीन -

शुक्रवारी (19 नोव्हेंबर) ला सायंकाळी गाेदाबाई पोपट ससाणे यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकुण मृत्यूची संख्या १३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणात नेमका काेणाला दाेष द्यायचा हा प्रश्नच आहे. आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणा यांच्यासह सहा जणांना कारवाई केली हाेती. त्यातील चाैघांना अटक झाली. अटक झालेल्या जामीन मंजूर झाला आहे. डाॅ. पाेखरणा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे.

चौकशी समितीच्या अहवाला कडे सर्वांचे लक्ष-

आराेग्यमंत्री डाॅ. राजेश टाेपे यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी पाठपुरावा केलेला नाही असा आरोप आता होऊ लागला आहे. विधानपरिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या घटनेत दाखल गुन्ह्यात आराेग्यमंत्री डाॅ. राजेश टाेपे आणि निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणा यांना आराेपी करावे, अशी मागणी केली हाेती. त्यासंदर्भात आपण स्वतः पत्र देऊ, असे सांगितले हाेते. परंतु त्यावरही काही झाले नाही. एकीकडे घटनेतील बळींची संख्या वाढत आहे. दुसरी कडे गुन्हा दाखल झालेल्या परिचारिका आणि एका महिला डॉक्टर बद्दल समाजीक सहानुभूती पुढे येत असताना ज्यांच्यावर मुख्य रोख आहे ते जिल्हा शक्य चिकित्सक डॉ पोखरणा अटकपूर्व जामीन घेऊन चौकशी समितीला सामोरे जात आहेत. परिचरिकांनी अकरा दिवस पुकारलेले कामबंद आंदोलन आज शुक्रवारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले आहे. अशात आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या2अध्यक्षतेखाली असलेली चौकशी समिती काय अहवाल देते आणि त्यात कुणा-कुणाला दोषी पकडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.