ETV Bharat / state

आडगांवमध्ये चोरट्यांनी 10 ते 15 क्विंटल सोयाबीन केले लंपास - सोयाबीन चोरी

शेतकऱ्यांनी पावसातून वाचलेल्या आणि काढणी केलेल्या पिकावरच चोरटे डल्ला मारत असल्याचे प्रकार जिल्ह्यामध्ये उघडकीस येत आहेत. दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील खोकर भोकर परिसरातील शेतकऱ्याची सोयाबीन चोरीला गेली आहे. आता राहाता तालुक्यातील आडगांव येथील शेळकेच्या शेतात दिवसा वाळण्यासाठी ठेवलेली सोयाबीन त्यांनी तशीच रात्री झाकुन ठेवली होती. मात्र सकाळी सोयाबीन लंपास केल्याचे समोर आले आहे.

सोयाबीन
सोयाबीन
author img

By

Published : Oct 29, 2021, 10:04 AM IST

Updated : Oct 29, 2021, 10:14 AM IST

अहमदनगर - अस्मानी संकटाचा सामना केल्यानंतर वाचलेली सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याचा विचार शेतकरी करत आहे. मात्र राहाता तालुक्यातील आडगांव येथील बाळासाहेब शेळके आणि भीमाशंकर शेळके या शेतकऱ्यांच्या खळ्यातील सोयाबीनच चोरट्यांनी लंपसा केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. सोयाबीन चोरांची चांगलीच दहशत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून अद्यापही पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

आडगांवमध्ये चोरट्यांनी 10 ते 15 क्विंटल सोयाबीन केले लंपास

राहाता तालुक्यातील आडगांव या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी पावसातून वाचलेल्या आणि काढणी केलेल्या पिकावरच चोरटे डल्ला मारत असल्याचे प्रकार जिल्ह्यामध्ये उघडकीस येत आहेत. दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील खोकर भोकर परिसरातील शेतकऱ्याची सोयाबीन चोरीला गेली आहे. आता राहाता तालुक्यातील अडगाव येथील शेळकेच्या शेतात दिवसा वाळण्यासाठी ठेवलेली सोयाबीन त्यांनी तशीच रात्री झाकुन ठेवली होती. मात्र सकाळी सोयाबीन लंपास केल्याचे समोर आले आहे. सध्या सोयाबीन सोंगणीकरुन काही शेतकरी शेतात वाळवत आहेत. मध्यंतरी सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता, आता काही शेतकरी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी सोयाबीन विकून चार पैसे मिळवत आहेत. सोयाबीन पिकांची होत असलेली चोरी पाहता परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.

हेही वाचा - प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने 'देवदूत' यंत्रणेचे काम बंद आंदोलन

Last Updated : Oct 29, 2021, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.