शिर्डी (अहमदनगर) : तेलंगणा राज्याचे प्रतिबंध आणि अबकारी, क्रीडा आणि युवा सेवा, पर्यटन आणि सांस्कृतिक आणि पुरातत्व मंत्री व्ही. श्रीनिवास गौड, तसेच कृषी सहकार आणि पणन मंत्री एस.निरंजन रेड्डी, यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांचा समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांचा दर्शनानंतर तेलंगणाचे कृषी, सहकार आणि पणन मंत्री एस.निरंजन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले मंत्री रेड्डी : मंत्री रेड्डी म्हणाले की, देशात मोदी सरकार आल्यापासुन चौकशी एजन्सीचा गैरवापर करत असुन विरोधी पक्षांचा नेत्यांना कमजोर करून झुकवण्याचे काम करत असल्याची टीका तेलंगणा राज्याचे कृषी, सहकार आणि पणन मंत्री एस.निरंजन रेड्डी यांनी शिर्डीत केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांची ईडी चौकशी सुरू असुन आमची पार्टी कायदेशीरपणे सामना करणार आहोत. कोणावर किचड उडवणे सोपे आहे. मात्र न्यायालयात काही सिद्ध होत नाही. आमच्यावर उडवलेले किचडाची आम्ही न्यायालयात साफ सफाई करणार असल्याचे यावेळी निरंजन रेड्डी म्हणाले आहे.
निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर कारवाई : मंत्री रेड्डी पुढे म्हणाले की, येत्या सहा ते सात महिन्यात तेलंगणा राज्यात निवडणूक लागणार आहेत. म्हणून निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारद्वारे कारवाई केल्या जात आहे. महाराष्ट्रात काय झाले विरोधक सत्तेवर होते म्हणुन भाजपने जबरदस्तीने विरोधाकडून सत्ता मिळावली. तसेच देशातील अनेक राज्यात भाजपने अशीच सत्ता मिळावली, असा घणाघात त्यांनी लावला.
केंद्र सरकारवर टीका : तेलंगणा राज्यातील विकासाचा कुठल्याही मुद्द्यावर भाजपने साथ दिली नाही. विरोधी पक्षाला भाजप दुष्मना सारखे वागणूक देत आहे. दुष्मनी देश सुद्धा अशी वागणूक देत नाहीत. देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्षे झाले. मात्र देशातील नागरिकांची परस्थिती अजून जसे की वैसी असुन जगातील छोट्या छोट्या देशांची प्रगती होतेय. मात्र, आज आपला देश तसाच आहे. 75 वर्षानंतर आपण देशाला नफरत देणार आहात का ? विकास देणार नाहीत का ? चांगले काम करण्यासाठी विरोधकांना विचारले पाहिजे, जनता आपल्याला निवडून देत आपण सत्तेत आल्यानंतर विरोधकांना बरोबर घेवुन विकास कामे केले पाहिजे , विरोधकांना दुष्मना सारखे बघायला नको, असाही टोला यावेळी निरंजन रेड्डी यांनी भाजपला लावला.