ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जामखेडमध्ये रास्ता रोको

आघाडी सरकारने विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणीस दिलेली स्थगिती उठवली. त्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर शेेतकऱ्यांचे व घरगुती तोडलेले वीज कनेक्शन तत्काळ जोडा व लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

शेतकरी संघटनेचा जामखेडमध्ये रास्ता रोको
शेतकरी संघटनेचा जामखेडमध्ये रास्ता रोको
author img

By

Published : Mar 20, 2021, 9:45 AM IST

Updated : Mar 20, 2021, 9:53 AM IST

अहमदनगर- लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिल माफ करावे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार जमा करावे, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जामखेड मध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनेदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जामखेडमध्ये रास्ता रोको
बीजबील वसुली स्थगिती निर्णय फिरवल्याबद्दल नाराजी-

संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड-नगर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते रस्त्यावर ठाणमांडून बसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आघाडी सरकारने विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणीस दिलेली स्थगिती उठवली. त्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर शेेतकऱ्यांचे व घरगुती तोडलेले वीज कनेक्शन तत्काळ जोडा व लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. दोन लाख रुपयांची कर्जमाफी करताना जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली ते कधी देणार? असा सवालही यावेळी सरकारला करण्यात आला.

इंधन दरवाढीमुळे जगने मुश्किल-
-पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव यामुळे महागाई वाढली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी समन्वय ठेवून दरवाढ कमी करावी व केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे मागे घ्यावे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

रास्तारोको आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, युवक तालुकाध्यक्ष राहुल पवार, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, जिल्हा संघटक अॅड.ऋषीकेश डुचे, संघटना प्रमुख हनुमान उगले, तालुका प्रसिद्धीप्रमुख कृष्णा डुचे, भीमराव पाटील, गणेश हागवणे आदी सहभागी झाले होते.

Last Updated : Mar 20, 2021, 9:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.