अहमदनगर - पुरोगामी महाराष्ट्रात अंदश्रद्धा पसरवली जात असल्याने हे राज्यासाठी दुर्दैवी आहे. माझा श्रध्देवर विश्वास आहे अंधश्रध्देवर नाही. किर्तनकारांचा मी आदर करते. मात्र, अशा प्रकारे व्यक्तव्य करून अंधश्रद्धा पसरवणे दुर्दैवी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. श्रीरामपुर येथे एका कार्यक्रमा दरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
राज्यातील महीलांबाबबत घडत असलेल्या घटना ह्या दुर्दैवी असून नाशिक येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत असल्याचेही सुळे म्हणाल्या. राज्यात कोणतेही सरकार असो माझा महाराष्ट्र पोलीसांवर पुर्ण विश्वास असून पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडत असल्याने जन जागृती करण्याची गरज असल्याचे सुळे म्हणाल्या.
हेही वाचा -'कीर्तनातून 'निवृत्ती'? आता फेटा उतरवून करणार 'शेती'
आमचे सरकार दड़पशाहीचे सरकार नसून आमच्या विरोधकांनी आमच्यावर दिलदारपणे टिका कराव्यात. आम्ही त्यांच्या प्रत्येक टिकेचा सन्मान करू. जनतेनी आम्हाला विश्वासने निवडून दिले असून आम्ही पाच वर्ष सरकार विश्वासाने चालवणार असल्याचे सुळे म्हणाल्या. केंद्र सरकारकडून 15 हजार कोटी रूपयांचा निधी अजुनही महाराष्ट्र सरकारला मिळाला नाही. केंद्र सरकारच्या धोरणांनी राज्य सरकार मोठ्या अडचणीत असताना पुन्हा निवडणूक लादणे किती संयुक्तिक ठरेल, असे त्या म्हणाल्या. .
हेही वाचा - कौटुंबिक वादातून पोलीस मुख्यालयासमोर पेटवून घेत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
केंद्रातील भाजप सरकारचे ज्या राज्यात आपले सरकार आले नाही त्या ठिकाणी विश्वासच्या नात्याने काम करत नसल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील तीन जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. याप्रसंगी राहीबाई पोपेरे, पोटाराव पवार, आणि श्रीरामपुरचे सुपुत्र झझिर खान यांची शनिवारी श्रीरामपूर नगर परिषदेच्यावतीने जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी झहिर खान येऊ शकले नसल्याने त्यांचे आई वडिल तसेच राहीबाई पोपेरे, पोटाराव पवार यांना साईंची मूर्ती आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.