ETV Bharat / state

२ वर्षानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटण्याचं ठिकाण येरवडा जेल असेल - सुजय विखे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे वाळू तस्कर, डाकू आहेत. यामध्ये माझ्यासारख्याचे काय काम आहे. त्यामुळेच मला लोकसभेला उमेदवारी दिली नसल्याचे वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

सुजय विखेंचा राष्ट्रवादीवर निशाणा
author img

By

Published : Oct 17, 2019, 5:14 PM IST

Updated : Oct 17, 2019, 6:14 PM IST

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे वाळू तस्कर, डाकू आहेत. यामध्ये माझ्यासारख्याचे काय काम आहे. त्यामुळेच मला लोकसभेला उमेदवारी दिली नसल्याचे वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांना २ वर्षानंतर भेटण्याचं ठिकाण संपर्क कार्यालय नव्हे, तर येरवडा जेल असेल. ईडीची केस झाली तर यांच्या डोळ्यात पाणी आलं, असे म्हणत सुजय विखेंनी अजित पवारांवर निशाणा साधला. त्यामुळे येणाऱ्या काळात विखे पवार संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माझे वडील मंत्री झाले, याचं श्रेय बाळासाहेब थोरातांना
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ल्या असलेल्या संगमनेरमध्ये भाजपचे खासदार सुजय विखे- पाटील यांची सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीसह बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला. मी म्हणणार नाही विकास पाहायला गुजरातला जा. दोन मतदारसंघ शेजारी आहेत माझ्या वडिलांचा आणि तुमचा (संगमनेर). आधी आम्ही एकाच पक्षात होतो, मात्र मी सत्ताधारी पक्षात आलो. माझे वडील मंत्री झाले. याच सर्व श्रेय बाळासाहेब थोरात यांना जातं. लोकसभेत तिकीट वाटपावरुन जो गोंधळ झाला त्यामुळे मला मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विधानसभेची निवडणूक झाल्यावर मी बाळासाहेब थोरांतांचा फोटो माझ्या घरात लावणार असल्याचा टोला सुजय विखेंनी लगावला.

सुजय विखेंचा राष्ट्रवादीवर निशाणा

हेही वाचा - 'देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी भाजपने गेल्या पाच वर्षांमध्ये काय केले?'

हेही वाचा - ओमराजेंनी लोकांचे संसार बुडवल्याचा राग म्हणून केला हल्ला; आरोपीचा व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीवाले म्हणतात वातावरण बदललं आहे. आमच्या सभांना जास्त गर्दी आहे. कोणाच्या तर अमोल कोल्हेच्या सभेला गर्दी आहे. तीन महिन्यात अमोल कोल्हे शेतकरी झाला. कांदा, सोयाबीन, ऊस सगळं यांना समजलं असेही विखे म्हणाले. मग आम्ही काय ३ वर्षांपासून शेतकरी नाही का? निवडणूक झाल्यावर मी देखील एक मालिका काढणार असल्याचा टोला सुजय विखे पाटलांनी कोल्हेंना लगावला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_लोकसभेला राष्ट्रवादीने मला उमेदवारी दिली नाही, याचं कारण मी सुशिक्षित आहे
माझ्यावर एकही केस नाही.राष्ट्रवादीमध्ये सगळे वाळू तस्कर, डाकू यात माझ्यासारख्याचं काय काम आहे. म्हणून मला उमेदवारी दिली नसल्याच व्यक्त सुजय विखे यांनी केलीय...राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना दोन वर्षानंतर भेटण्याचं ठिकाण संपर्क कार्यालय नव्हे तर येरवडा जेल असेल..ईडीची केस झाली तर यांच्या डोळ्यात पाणी आलं, अशी टीका अजित पवार यांचं नाव न घेता सुजय विखे यांनी संगमनेर मध्ये केली आहे....

VO_काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे खासदार सुजय विखे- पाटील यांची काल सभा पार पडलीय यावेळी सुजय विखे-पाटलांनी राष्ट्रवादी आणि बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका केलीय..मी म्हणणार नाही विकास पहायला गुजरातला जा. दोन मतदारसंघ शेजारी आहेत माझ्या वडिलांचा आणि तुमचा (संगमनेर). आधी आम्ही एकाच पक्षात होतो, मात्र मी सत्ताधारी पक्षात आलो. माझे वडील मंत्री झाले. याच सर्व श्रेय बाळासाहेब थोरात यांना जातं. लोकसभेत तिकीट वाटपावरुन जो गोंधळ झाला त्यामुळे मला मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विधानसभेची निवडणूक झाल्यावर मी बाळासाहेब थोरांतांचा फोटो माझ्या घरात लावणार असल्याच टोला सुजय विखेंनी लगावला...राष्ट्रवादीवाले म्हणतात वातावरण बदललं आहे. आमच्या सभांना जास्त गर्दी आहे. कोणाच्या तर अमोल कोल्हेच्या सभेला गर्दी आहे. तीन महिन्यांत अमोल कोल्हे शेतकरी झाला. कांदा, सोयाबीन, ऊस सगळं यांना समजलं.
मग आम्ही काय तीन वर्षांपासून शेतकरी नाही का? निवडणूक झाल्यावर मी देखील एक मालिका काढणार असल्याचा टोला सुजय विखे पाटलांनी लगावला....Body:mh_ahm_shirdi_sujay vikhe on thorat_17_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sujay vikhe on thorat_17_visuals_bite_mh10010
Last Updated : Oct 17, 2019, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.