ETV Bharat / state

मुलाला कमी ऐकू येते म्हणून डॉक्टरची पत्नी आणि २ मुलांसह आत्महत्या

डॉ. महेंद्र थोरात असे या डॉक्टरांचे नाव आहे. पत्नी वर्षा, थोरला मुलगा कृष्णा आणि धाकटा कैवल्य यांना सलायन आणि इंजेक्शनमधून विषारी औषध देऊन यांची हत्या केल्यानंतर स्वतः डॉक्टर थोरात यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

डॉ. महेंद्र थोरात
डॉ. महेंद्र थोरात
author img

By

Published : Feb 20, 2021, 3:10 PM IST

Updated : Feb 20, 2021, 8:10 PM IST

अहमदनगर - कर्जत तालुक्यातील राशीन येथे आज सकाळी खळबळजनक घटना घडली आहे. एका डॉक्टरने पत्नी व मुलांसह आत्महत्या केली आहे. या प्रकाराने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. महेंद्र थोरात असे या डॉक्टरांचे नाव आहे. पत्नी वर्षा, थोरला मुलगा कृष्णा आणि धाकटा कैवल्य यांना सलायन आणि इंजेक्शनमधून विषारी औषध देऊन यांची हत्या केल्यानंतर स्वतः डॉक्टर थोरात यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

सामाजिक कामात अग्रेसर

डॉ. थोरात हे गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. सकाळी पेशंट त्यांच्या घरी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सामाजिक कामात अग्रेसर असलेला माणूस नेमके असे कसे काय करू शकतो, याची चर्चा सुरू झाली आहे. पत्नी व दोन मुलांना इंजेक्शन देऊन नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस या घटनेबाबत सखोल तपास करीत आहेत.

गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित

गोर गरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. डॉक्टरांच्या दवाखान्यात एखादा पेशंट आला अन् त्याच्याकडे पैसे नसले तर ते स्वतः औषधे घेण्यासाठी पैसे द्यायचे, इतकी त्यांची रूग्णांबाबत तळमळ असायची. त्यामुळे त्यांची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली व संपूर्ण गाव बंद करण्यात आले. इतका सहृदय माणूस असा कसा करू शकतो, याने राशीनसह कर्जत परिसराला घेरले आहे.

मुलाला ऐकू येत नसल्याने कुटुंब होते नैराश्यात

त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटनुसार, त्यांच्या थोरल्या मुलाला ऐकायला कमी येत होते. त्याला समाजाकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळायची. यामुळे ते दाम्पत्य व्यथित होते. तो मुलगा अकरावीला आहे. पत्नीच्या मदतीने जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचा यात उल्लेख आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Last Updated : Feb 20, 2021, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.