ETV Bharat / state

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये अधिकाऱ्यांची नावं

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येला आरोग्य खात्यातील वरिष्ठांसह तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

डॉक्टरची आत्महत्या
डॉक्टरची आत्महत्या
author img

By

Published : Jul 6, 2021, 7:32 PM IST

अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी सोमवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान उपकेंद्रातच पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहलेली एक सुसाईड नोट सापडली असून त्यात आरोग्य खात्याच्या वरिष्ठांसह तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या तणावात आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. या घटनेने तालुक्यात आणि जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सुसाईड नोट
सुसाईड नोट

तासगावहून आल्यानंतर डॉक्टर तणावात -

डॉ. शेळके आरोग्य केंद्रात कामावर आले. त्यानंतर काही वेळाने कामानिमित्त तिसगावला गेले. तिसगावाहून परत आले त्यावेळी ते तणावाखाली असल्याचे उपस्थित असलेल्या इतर आरोग्य सेविकांना जाणवले. सेविकांनी त्यांच्याशी संवाद केला. नोकरीमध्ये हे होतचं असते म्हणत काळजी घेऊ नका, असे सेविकांशी शेळके यांना म्हटले. त्यानंतर ते पेन व कागद घेऊन आले. टॅब जमा करा, मी राजीनामा लिहिणार आहे, असे त्यांनी आरोग्य सेविकांना सांगितले. त्यानंतर ते दुसऱ्या रुममध्ये गेले व दरवाजा आतून लावुन घेतला.

पंख्याच्या हुकला दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास -

लसीकरणानंतर परिचारिकांनी डॉ. शेळके यांना जेवणासाठी आवाज दिला. आतुन आवाज येत नाही म्हणुन दरवाजा वाजवला. पण आतुन कोणताही आवाज आला नाही. तसेच फोन लावल्यानंतर फोनही उचलला नाही. त्यानंतर सेविकांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून डॉ. शेळके पंख्याच्या हुकाला दोरी लावून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांची नावे -

डॉ. शेळके यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही सुसाईड नोट स्टुलवर सापडली. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे हे आत्महत्या करण्यास जबाबदार असून प्रशासन सेवेतील तहसीलदार, जिल्हाधिकारी हेही जबाबदार आहेत. अतिरिक्त कामाचा ताण तसेच वेळत पगार नाही व पगार कपातीची धमकी यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहुन ठेवले आहे.

गुन्हा दाखल -

डॉ. गणेश शेळके यांचे पार्थिव उच्चस्तरीय तपासणीसाठी पाथर्डी येथे नेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येत असुन पोलीस हवालदार सतीश खोमने, अरविंद चव्हाण, भाऊसाहेब तांबे व पोलीस निरिक्षक कौशल्य निरंजन वाघ हे अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.