ETV Bharat / state

हिवरेबाजारमध्ये शाळा सुरू होऊन 100 दिवस पूर्ण; पालकासंह विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा

author img

By

Published : Sep 28, 2021, 9:01 PM IST

Updated : Sep 28, 2021, 9:09 PM IST

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, तत्पूर्वीच कोरोना अजूनही पूर्ण संपलेला नसताना उपाययोजना करत हिवरेबाजारने राज्याला आदर्शवत उदाहरण दाखवून दिले आहे. त्यासाठी सरपंच पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, गावातील आरोग्य यंत्रणा व फ्रंटवर्कर टीम यांनी कोरोनामुक्तीची पंचसूत्री राबविली.

हिवरेबाजार शाळा
हिवरेबाजार शाळा

अहमदनगर- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात राज्यात सर्वत्र शाळा-विद्यालये बंद आहेत. असे असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजाराने धाडसी निर्णय घेत पंधरा जूनला शाळा सुरू आहे. ही शाळा सुरू होऊन 25 सप्टेंबरला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. शाळा संपूर्ण शंभर दिवस अविरत सुरू राहिल्याने गावामध्ये विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

गावपातळीवरील घेतलेल्या आरोग्य सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजनेमुळे हिवरे गावात एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. याबाबत बोलताना हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार म्हणाले, की ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा आहेत. हे पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑफलाइन शिक्षण हाच पर्याय आहे. मात्र, त्यासाठी कोरोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. आम्ही ते पाळल्याने शंभर दिवसांनंतरही शाळा सुरक्षितपणे अविरत सुरू आहे.

हिवरेबाजारमध्ये शाळा सुरू होऊन 100 दिवस पूर्ण

हेही वाचा-मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 1500 कोटींच्या घोटाळ्याचा किरीट सोमैयांचा आरोप

पंचसुत्री राबवून काही दिवसांत हिवरेबाजार 100 टक्के कोरोनामुक्त-
जूनपूर्वी हिवरेबाजारमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले होते. मात्र, पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, गावातील आरोग्य यंत्रणा, फ्रंटवर्कर टीम यांनी कोरोनामुक्तीची पंचसूत्री राबविली. अवघ्या काही दिवसांत हिवरेबाजार 100 टक्के कोरोनामुक्त झाले.

हेही वाचा-MPSC Result: दोन वर्षानंतर MPSCचा सुधारित निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

15 जूनपासून गावात दहावीपर्यंत शाळा सुरू-

जूनमध्ये शैक्षणीक वर्ष सुरू होत असताना राज्यातील इतरत्र सर्वत्र शाळा-विद्यालये बंद होती. मात्र, हिवरेबाजार शंभर टक्के कोरोनामुक्त असल्याने गावाने शाळा सुरू करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे पहिली ते सातवी तर यशवंत विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग 15 जून रोजी सुरू करण्यात आले आहेत. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर शाळेने 100 दिवस विनाअडथळा पूर्ण केले आहेत. त्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी कोरोनाच्या काळातील नियमांचे पालन केले.

हेही वाचा-तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अनिल परब ईडी कार्यालयातून पडले बाहेर !
हिवरेबाजारची राज्यात आदर्शग्राम अशी ओळख
राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, तत्पूर्वीच कोरोना अजूनही पूर्ण संपलेला नसताना उपाययोजना करत हिवरेबाजारने राज्याला आदर्शवत उदाहरण दाखवून दिले आहे. यापूर्वीच अनेक आदर्श उपक्रम यशस्वी राबवून हिवरेबाजारने राज्यात आदर्शग्राम अशी ओळख निर्माण केली आहे.

Last Updated : Sep 28, 2021, 9:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.