शिर्डी : आपल्या देशात स्त्रियांना एक मानाचे वेगळे स्थान आहे. पठाण चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा निर्णय एकप्रकारे योग्यच असल्याचे सांगत मी शाहुरुख खानचा आदर करतो. मात्र एका गाण्यात जे दाखवल गेले ते योग्य वाटले नाही असे सडेतोड उत्तर दक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते पृध्वी राज यांनी व्यक्त ( South Indian actor Pridhvi Raj ) केले.
दक्षिणात्य चित्रपटात संस्कृतीचे रक्षण : दरम्यान दक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते पृध्वी राज यांनी सकाळी साई दरबारी कुटुंबियासह हजेरी लावून साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी म्हटले की, दक्षिणात्य चित्रपटात संस्कृतीचे रक्षण केले ( Southern Cinema protected Culture ) जाते. संस्कृतीचे अधपतन करणारे चित्रपट केले तर त्याचा तीव्र विरोध केला जातो. बॉलीवूड इंडस्ट्रीनेही देखील भारतीय संस्कृतीचे जतन करायला हवे. इंडीयन सिनेमा इंडस्ट्रीज चांगली असतांना तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचा का अवलंब करता असा सवाल व्यक्त केला आहे. तेलगूमध्ये पुष्पा चित्रपट आला तो मोठ्या प्रमाणात हिंदी मध्ये हिट झाला.त्यानंतर केजीएफ, बाहुबली असे एकापाठोपाठ एक चित्रपट हिट झाले. यावरून तांत्रीकदृष्ट्या ट्रॉलीवुडचे दिग्दर्शक प्रगतीपथावर आहे. बॉलिवूड तेलगूपेक्षा कमी नाहीये तो मोठ्या भावाप्रमाणे आहे तर ट्रॉलीवुड लहान भावासारखा असल्याचे ते म्हणाले. भारतीय संस्कृतीचे अधपतन करणारे चित्रपट ( Bollywood culture should be protected Culture ) नकोत. चित्रपटात तुम्ही देवतांचे, भारतीय संस्कृतीचे दाखवा लोक त्याचे स्वागतच करतील मात्र त्याची तोडमोड केली गेली तर ते स्विकारणार नाही असेही त्यांनी सांगितले.
दक्षिणेत येऊनही रजणिकांत फेमस : सध्या टॉलीवूड बॉलवीडची चर्चा होत असते. अनेक साऊथचे चित्रपट हिट ठरलेत. आमच्याकडे डि ग्रेड चे सिनेमांना सेन्सॉर बोर्ड मान्यता देत नाही. त्यामुळे ते रिलीज होत नाही. ट्रॉलीवूडमध्ये भारतीय संस्कृतीला प्राधान्य देण्यात येते. बॉलीवुड, ट्रॉलीवुड असा भेदभाव नकोय आपण सर्व भारतीय आहोत आणि आपली चित्रपट इंडस्ट्री ही जगभरात भारतीय सिनेमा इंडस्ट्री म्हणून ओळखली जावी. एकेकाळी महाराष्ट्रातून साऊथमध्ये पदार्पण केलेले शिवाजी गायकवाड ऊर्फ अभिनेता रजनीकांत यांना दक्षिणात्य लोकांनी सुपरस्टार बनवले आहे हे त्यांनी विसरून चालणार नाही. सध्या त्यांना जास्त गर्व झाला असून एकदिवस साऊथची जनता त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहाणार नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले.
हिंदू असल्याचा अभिमान : सध्या केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे योग्य काम सुरू आहे. तुम्ही इकडे जसे साईराम म्हणतात तसे आम्ही आमच्याकडे जय श्रीराम म्हणतो. आपण हिंदू असल्याचा अभिमान (Proud to be a Hindu ) आहे असेही त्यांनी म्हटले.