शिर्डी ( अहमदनगर )- गेल्या चार वर्षाभरात राज्यात तब्बल अडीचशेहून अधिक बालविवाह रोखण्यात संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी यश आले ( Ranjana Gawande Prevents Child Marriages ) आहे. बालविवाह रोखण्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ( Child Marriage In India ) अहमदनगर जिल्हा अग्रेसर असल्याचे एकंदरीत चित्र ( Child Marriage Prevention Maharashtra) आहे.
अहमदनगर जिल्हा अग्रेसर
कोरोना काळात आणि कोरोनाच्या आधी अशा चार वर्षाच्या कालावधीत राज्यातील अनेक जिल्हातील भटक्या समाजाचे आणि इतर समाजाचे तब्बल अडीशेच्यावर बालविवाह हे रोखण्यात संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते रंजना गवांदे यांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यांनामध्ये सर्वात जास्त बालविवाह गवांदे यांनी रोखले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगर जिल्हा बालविवाहत अग्रेसर असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
प्रशासनाचे सहकार्य नाही
भटक्या जमाज्यातील सात वर्ष वयोगटाच्या पुढे बालविवाह लावले जातात. तर काहींमध्ये नवरदेव वीस ते पंचवीस वर्षे तर, मुलीचे वय हे सातच्या पुढे असते. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक बालविवाह रोखले गेले आहेत. बालविवाह रोखण्याचं काम करत असतांना प्रशासनाच पुरेसे सहकार्य मिळत नाही. इतकंच नाही तर शासनाची आकडेवारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आकडेवारीत तफावत असते. शासन स्तरावर आकडेवारी कमी दाखवली जाते. अडीचशेचा आकडा हा एका सामाजिक कार्यकर्तीने रोखलेल्या बालविवाहाचा आहे. इतरांची विचार केला तर, राज्यातील आकडेवारी मोठी होईल. बालविवाह विषयीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचं आजही दिसून येतंय.