ETV Bharat / state

तिचे हस्ताक्षर आहे मोत्याहूनही सुंदर! - श्रेया सजन हस्ताक्षर न्यूज

श्रेया सजन ही आठ वर्षांची मुलगी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. श्रेयाने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक मिळाला. त्यानंतर श्रेयाच्या वडीलांनी ते फेसबुकवर पोस्ट केले. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. तिच्या वडीलांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओची दखल राज्यातील मंत्र्यांनी देखील घेतली.

श्रेया सजन
श्रेया सजन
author img

By

Published : Feb 7, 2020, 7:48 PM IST

अहमदनगर - एका जिल्हा परिषेद शाळेतील आठ वर्षांची मुलगी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. श्रेया सजन असे या मुलीचे नाव असून ती तिसरी इयत्तेमध्ये शिकते. तिच्या हस्ताक्षरामुळे देश-विदेशात तिचे कौतुक होत आहे.

श्रेया सजन ही आठ वर्षांची मुलगी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे
श्रेया सजन राहुरीमधील कडूवस्ती जिल्हा प्राथमिक शाळेत शिकते. श्रेयाने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक मिळाला. त्यानंतर श्रेयाच्या वडीलांनी ते फेसबुकवर पोस्ट केले. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. तिच्या वडीलांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओची दखल राज्यातील मंत्र्यांनी देखील घेतली.

हेही वाचा - जगासमोर आदर्श ठेवणारी जिल्हा परिषदेची 'झिरो एनर्जी शाळा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तिचे हस्ताक्षर असलेले पान ट्विटरवर पोस्ट केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी 'श्रेयाला तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा! तुझाच जयंत काका' असे एक पत्रही तिला लिहले. उच्च तंत्रशिक्षण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू, खासदार सुप्रीया सुळे, खासदार सुजय विखे यांनीही श्रेयाचे कौतुक केले आहे.

श्रेयाचे वडील गोरक्षनाथ सजन हे श्रेयाच्या शाळेत शिक्षक आहेत. श्रेयाचे हस्ताक्षर सुंदर असल्याने पहिलीच्या वर्गापासून त्यांनी तिच्या हस्ताक्षराकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. त्यांनी युट्यूबवर कॅलीग्राफीचे व्हिडीओ पाहून तिला मार्गदर्शन केले. तिने मिळवलेले यश पाहून खूप आनंद होत असल्याची भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

Intro:

ANCHOR_ अनेकजण जिल्हा परिषेद शाळेत आपल्या मुलांना प्रवेश घेताना नाक मुरडतात...पण जिल्हा परिषेद शाळेत अनेक व्यक्तिमत्व घडली आहेत आणि घडतही आहेत..अशाच एका जिल्हा परिषेद शाळेतील अवघ्या 8 वर्षाची श्रेया" सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे...नेमकी कोण आहे श्रेया पाहुया ई टीव्ही भारतच्या या विशेष रिपोर्ट मध्ये...

VO _गेल्या काही दिवसांपासून सुंदर हस्ताक्षर असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे...या व्हिडीओला बघतात बघता हजारो लाईक्स आणि कमेंटची बरसात होत आहे.हे सुंदर हस्ताक्षर तिसरीत शिकणाऱ्या श्रेया सजन या मुलीचं असून ती राहुरी मधील कडुवस्ती जिल्हा प्राथमिक शाळेत शिकते. विशेष म्हणजे श्रेयाच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील,बच्चु कडू,सुप्रीया सुळे,प्राजक्त तनपुरे या मञीमोदयां बरोबरचं महाराष्ट्र भरातुन भरभरून कौतुक केलं जात आहे....

VO_ राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरीच्या इयत्तेत शिकणारी श्रेया गोरक्षनाथ सजन हिने जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला होता...शाईच्या पेनाने लिहिलेल्या हे पान सुंदर आणि वळणदार शब्दानी ते गुंफल गेलं आहे. यातील एक- एक अक्षर हे जणू मोत्यासारखं भासत आहे...यातील प्रत्येक शब्दाची ठेवण ही वेगवेगळी आणि नजरेस भरणारी अशी आहेत. या स्पर्धेत तिनं द्वितीय क्रमांकही मिळालाय...त्यानंतर श्रेयाच्या वडीलांनी ते फेसबुकवर पोस्ट केलं. यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षावच केलाय..तिच्या वडीलांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओचे प्रचंड व्हायरल झालाय...याची दखल खुद्द मंञ्यांनी देखील घेतलीय..राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी नामदार जयंत पाटील यांनी तिचे हस्ताक्षर असलेले पान ट्विटरवर पोस्ट केलं आहे...प्रिय श्रेया, तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरुर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा! तझाच जयंत काका..अशी पोस्टही जयंत पाटील यांनी ट्विटरवर केली आहे...तर उच्च तंञशिक्षण राज्य मंञी प्राजक्त तनपुरे, शालेय शिक्षण राज्य मंञी बंच्चू कडू,खासदार सुप्रीया सुळे खासदार सुजय विखे, मनसे वृत्तांत आदि फेसबुक पेजवर ह्या विद्यार्थ्यांनीच कौतुक केल जातय....

VO_ श्रेयाचे वडील गोरक्षनाथ सजन हे याच शाळेत शिक्षक आहेत..श्रेयाच हस्ताक्षर सुंदर असल्याने पहिलीच्या वर्गापासून त्यांनी तिच्या हस्ताक्षराकडे लक्ष द्यायला सुरूवात केली अनेकदा तिला स्पर्धेत अपयशही आलं...श्रेयाच्या वडीलांनी कॅलीओग्राफीचा एक व्हिडीओ युटयूबवर बघितला. त्यानंतर श्रेयाला खोडलेल्या निपच्या पेनने हस्ताक्षर गिरवायला सुरुवात केली..सुरुवातीला श्रेयाला लिहिताना बोटाला त्रास होत होता. तरीही रोज एक पान तिच्यांकडून लिहून घ्यायचो. आता तिच हे यश पाहून खूप आनंदी असल्याची भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे....

Body:mh_ahm_shirdi_handwriting girl best_7_ special pkg_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_handwriting girl best_7_ special pkg_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.