ETV Bharat / state

शिर्डी : किराणा दुकानदाराची हत्या; अकरापैकी पाच आरोपी अटकेत - shopkeeper murder latest news shirdi

शिर्डीच्या शासकीय गेस्ट हाऊस समोरील देशमुख चारी येथे निमगाव हद्दीमध्ये रवींद्र साहेबराव माळी यांचे व आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याची तक्रार शिर्डी पोलीस स्थानकात रवींद्र साहेबराव माळी यांनी केली होती.

shopkeeper murder in shirdi, case filed
शिर्डी : किराणा दुकानदाराची हत्या
author img

By

Published : Nov 20, 2020, 8:31 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत गुन्हेगारीराज हळूहळू डोके वर काढू लागले आहे. गुरूवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारी जवळील राहणाऱ्या किराणा दुकानदाराची हत्या केली. रवींद्र साहेबराव माळी (वय-३७) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अकरा जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे प्रकार?

शिर्डीच्या शासकीय गेस्ट हाऊस समोरील देशमुख चारी येथे निमगाव हद्दीमध्ये रवींद्र साहेबराव माळी यांचे व आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याची तक्रार शिर्डी पोलीस स्थानकात रवींद्र साहेबराव माळी यांनी केली होती. याचा राग धरून अकरा जणांनी १९ नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजेदरम्यान देशमुख चारीजवळ रवींद्र माळी यांच्यावर मानेवर चाकूने वार केले. तसेच त्यांना जबर जखमी करून त्यांचा खून केला.

हेही वाचा - पैठणमध्ये इंडिया बँकेचे एटीएम मशीन गायब... पहाटेच्या अंधारात 'डाव'

आरोपींची नावे - अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रविंद्र बनसोडे, समीर शेख, अज्जु पठाण, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड, कुणाल जगताप आणि इतर.

मृत रविंद्र माळी यांचा मुलगा रोहित माळी याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीने परिसरात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या कारवाईत आतापर्यंत पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर उर्वरितांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शिर्डी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.