ETV Bharat / state

संतापजनक... कापूस विकू दिला नाही म्हणून मुलानेच केली पित्याची हत्या - son killed father shirdi

मृत सोन्याबापू किसन वाकचौरे यांच्या शेतात 7 ते 8 क्विंटल कापसाचे पीक आले आहे. गुरुवारी संध्याकाळी 8.30 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा आरोपी संतोष सोन्याबापू वाकचौरे हा घरी आला. त्यांने घरच्यांना शिवीगाळ केली. तसेच घरात साठवून ठेवलेला कापूस विकणार असल्याचे म्हणाला.

shocking... son killed father in shirdi
मुलानेच केली पित्याची हत्या (संग्रहीत)
author img

By

Published : Dec 24, 2019, 5:21 PM IST

अहमदनगर - कापूस विकू दिला नाही म्हणून जन्मदात्या पित्याचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास समोर आली आहे. सोन्याबापू किसन वाकचौरे (वय 70) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडली. यानंतर आश्वी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

शिर्डीतील संतापजनक प्रकार

मृत सोन्याबापू किसन वाकचौरे यांच्या शेतात 7 ते 8 क्विंटल कापसाचे पीक आले आहे. गुरुवारी संध्याकाळी 8.30 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा आरोपी संतोष सोन्याबापू वाकचौरे हा घरी आला. त्यांने घरच्यांना शिवीगाळ केली. तसेच घरात साठवून ठेवलेला कापूस विकणार असल्याचे म्हणाला. यावेळी त्याचे वडील सोन्याबापू वाकचौरे त्याला दारू पिऊ नको, आपण कापूस विकू असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला राग आल्याने कापूस पेटवण्याची धमकी देत त्याने सासर्‍याबरोबर झटापट केली. त्याची पत्नी भांडणात मध्यस्थी करायला गेली तर तिलाही धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर ते सर्व झोपले.

सोमवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास बाहेर झोपलेल्या आरोपीने जोरजोरात घराचा दरवाजा वाजवण्यास सुरूवात केली. मी आताच कापूस पेटवून देईन, असे तो बोलू लागला. यावेळी मृत सोन्याबापू तिथे आले. त्यांनी त्याला पुन्हा समजावण्याच प्रयत्न केला. मात्र, त्याने सोन्याबापू वाकचौरे यांचे डोके दगडावर आपटून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या डोके आणि कानातून रक्त येऊ लागले. यावेळी आरोपीच्या पत्नीने आरडाओरड केली. मात्र, शेजारील कोणीही धावून आले नाही. यामुळे तिने नातेवाईंकाना फोन करुन बोलावून घेतले. यानतंर आधी सरकारी आणि नंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी सासर्‍यांना दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - मुंबईत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात आरोपी संतोष विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक सुनिता काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला केला. सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, एकनाथ बर्वे, शांताराम झोडंगे, अमर दाडंगे आणि संदीप रोकडे या पोलीस कर्मचार्‍यांनी आरोपी संतोष वाकचौरे याला ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नयन पाटील हे करत आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास कापूस विकू दिला नाही म्हणून जन्मदात्या पित्याचे दगडावर डोके आपटून मुलाने
खून केल्याची घटना उघडकीस आली असून आश्वी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे....

VO_ संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत आरोपीच्या पत्नीने म्हटले आहे की, आमच्या शेतात 7 ते 8 क्विंटल कापसाचे पीक आले आहे. गुरुवारी संध्याकाळी 8.30 वाजेच्या सुमारास माझे पती संतोष सोन्याबापू वाकचौरे हे घरी आले. त्यांनी आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व घरात साठवून ठेवलेला कापूस विकणार असल्याचे म्हणाला..यावेळी सासरे सोन्याबापू किसन वाकचौरे (वय 70) यांनी पतीला दारू पिऊ नको, आपण कापूस विकू असे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या पतीला राग आल्याने त्यांनी कापूस पेटवण्याची धमकी देत सासर्‍याबरोबर झटापट केली. मी मध्ये गेले असता मला ही धक्काबुक्की केली यानंतर आम्ही झोपी गेलो होतो...

VO_ सोमवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास बाहेर झोपलेल्या माझ्या पतीने जोरजोरात घराचा दरवाजा वाजवण्यास सुरवात केली. मी आताचं कापूस पेटवून देईन असे बोलू लागला. यावेळी माझे सासरे तेथे आले व त्यांनी माझ्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पती संतोष वाकचौरे याने सासरे सोन्याबापू वाकचौरे यांचे डोके दगडावर आपटून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे सासर्‍याच्या डोके व कानातून रक्त येऊ लागले. मी आरडाओरड केली परंतू, शेजारील कोणीही धावून न आल्यामुळे मी माझ्या नातेवाईकाना फोन करुन बोलावून घेतले. यानतंर आधी सरकारी व नंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी सासर्‍याना दाखल केले परंतु त्यांचा मृत्यू झाला....

VO_ याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नबंर 141/2019 नुसार भारतीय दंड संहिता 302, 323, 504 प्रमाणे दाखल केला आहे..सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक सुनिता काळे, उपविभागिय पोलीस अधिकारी रोशन पंडित, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला केला. सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, एकनाथ बर्वे, शांताराम झोडंगे, अमर दाडंगे व संदीप रोकडे या पोलीस कर्मचार्‍यांनी मोठ्या शिताफीने आरोपी संतोष वाकचौरे याला ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील हे करत आहेत....Body:mh_ahm_shirdi_killing the father_24_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_killing the father_24_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.