ETV Bharat / state

खासदार विखेंचा नुकसान पाहणी दौरा, शिवसेनेचे माजी आमदार औटी अनुपस्थित

तीन वेळेस शिवसेनेचे आमदार असलेल्या आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या विजय औटी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे औटी हे विखे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासदार सुजय विखे यांच्या पाहणी दौऱ्यात औटी अनुपस्थित होते.

खासदार विखेंचा नुकसान पाहणी दौरा
author img

By

Published : Nov 10, 2019, 4:33 AM IST

अहमदनगर- खासदार सुजय विखेंनी शनिवारी शेतीच्या नुकसानीची पहाणी केली. या दौऱ्यावर शिवसेनेच्या स्थानीक नेत्यांनी बहिष्कार टाकल्याचे समजते. तशी पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.

खासदार सुजय विखेंनी शनिवारी तालूक्यातील शेतीच्या नुकसानीची पहाणी केली. शिवसेना तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी त्यांनी निरोप दिले होते. माजी आमदार विजयकुमार औटी यांनासुद्धा फोन केला होता. मात्र, ते आले नाहीत. लोकसभेला सुजय विखे यांना पारनेर तालुक्यातून मोठी आघाडी असताना तीन वेळेस शिवसेनेचे आमदार असलेल्या आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या विजय औटी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे औटी हे विखे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासदार सुजय विखे यांच्या पाहणी दौऱ्यात औटी अनुपस्थित होते. यावर विखेंना विचारले असता, आम्ही विधानसभा प्रचारादरम्यान युती धर्म पाळला आहे. तरीही कोणाचा गैरसमज झाला तर त्याला इलाज नाही. मात्र, असा निकाल का लागला त्याचे आत्मचिंतन करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, विखेंच्या दौऱ्यावर बहिष्कार घातल्याचे शिवसेनेचे आवाहन सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यावर विखे म्हणाले, मी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र असते तर मान्य केले असते. जे आले नाहीत त्यांना शेतीचे पंचनामे करायचे असतील. तालुकाध्यक्ष विकास रोहकले यांनी तसे पत्र काढले असते तर ते मी मान्य केले असते. आम्ही विधानसभा प्रचारादरम्यान यूतीचा धर्म पाळला आहे. कोणाचा गैरसमज झाला तर त्याला इलाज नाही.

Intro:अहमदनगर- खा.विखे नुकसान पाहणी दौऱ्यात शिवसेनेचे मा.आ. औटी अनुपस्थित.. खा.विखेंवर नाराजीची चर्चा Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_sujay_auti_clash_image_7204297

अहमदनगर- नुकसान पाहणी दौऱ्यात शिवसेनेचे मा.आ. औटी अनुपस्थित.. खा.विखेंवर नाराजीची चर्चा

अहमदनगर- आम्ही विधानसभा प्रचारादरम्यान युतीचा धर्म पाळला आहे. तरीही कोणाचा गैरसमज झाला तर त्याला इलाज नाही, मात्र असा निकाल का लागला त्याचे आत्मचिंतन करणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी पारनेर इथे स्पष्ट सांगितले. लोकसभेला सुजय विखे यांना पारनेर तालुक्यातून मोठी आघाडी असताना तीन वेळेस शिवसेनेचे आमदार असलेल्या आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या विजय औटी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे औटी हे विखे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खा.सुजय यांच्या पाहणी दौऱ्यात औटी अनुपस्थित दिसल्याने यावर बोलताना सांगितले की हा दौरा राजकिय नव्हता. पिकाच्या नुकसानीच्या पहाणीसाठी होता. तालुक्यात येताना शिवसेना तालुकाध्यक्ष व
पदाधिकाऱयांना निरोप दिले होते. मा.आ.विजयकुमार औटी यांनासुद्धा फोन केला होता. ते आले नाहीत, हा ज्यांचा त्याचा प्रश्न आहे.
विखेंच्या दौरावर बहिष्कार घातल्याचे शिवसेनेचे आवाहन सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यावर विखे म्हणाले, मी त्यांच्या पदाधिकाऱयांच्या सहीनिशी पत्र असते तर मान्य केले असते. जे आले नाहीत त्यांना शेतीचे पंचनामे करायचे असतील. तालुकाध्यक्ष विकास रोहकले यांनी तसे पत्र काढले असते तर ते मी मान्य केले असते. आम्ही विधानसभा प्रचारादरम्यान यूतीचा धर्म पाळला आहे. कोणाचा गैरसमज झाला तर त्याला इलाज नाही. मात्र असा निकाल का लागला, त्याचे आत्मचिंतन करणार आहे. 

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- खा.विखे नुकसान पाहणी दौऱ्यात शिवसेनेचे मा.आ. औटी अनुपस्थित.. खा.विखेंवर नाराजीची चर्चा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.