ETV Bharat / state

SPECIAL: नगर महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची निवड; मात्र पक्षांतर्गत राड्याने आनंदावर विरजन - Shiv Sena fight bhau Korgaonkar

महानगरपालिकेच्या महापौर पदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे, तर उपमहापौर पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोसले यांची आज अधिकृतपणे निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घोषणा केली. या दोघांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने या पदावर शेंडगे आणि भोसले यांची निवड कालच अंतिम झाली होती.

City Mayor Rohini Shendge
शिवसेना राडा भाऊ कोरगावकर
author img

By

Published : Jun 30, 2021, 6:01 PM IST

Updated : Jun 30, 2021, 6:47 PM IST

अहमदनगर - महानगरपालिकेच्या महापौर पदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे, तर उपमहापौर पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोसले यांची आज अधिकृतपणे निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घोषणा केली. या दोघांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने या पदावर शेंडगे आणि भोसले यांची निवड कालच अंतिम झाली होती. महापालिकेत राष्ट्रवादीच्या सोबतीने शिवसेनेने भगवा फडकविला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी, शिवसेनेच्या नूतन महापौर, राष्ट्रवादीचे नूतन उपमहापौर, शिवसैनिक आणि शिवसेना संपर्कप्रमुख

हेही वाचा - शिर्डीत धार धार शस्त्राने हल्ला करून साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा खून

दुसरीकडे काल रात्री शिवसेनेच्या दोन गटात झालेल्या राड्याला संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी माध्यमांचा खोडसाळपणा म्हणत झाकली मूठ सव्वालाखाची, असे केले. सेना नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातील तुंबळ हनामारीचा व्हिडिओ व्हायरल होत असताना कोरगावकर माध्यमांवर सटकले आहेत.

रात्री यथेच्छ शिवसेनेंतर्गत राडा -

यथेच्छ धुलाई कार्यक्रम, शिवसेना स्टाईल रात्री नगरमध्ये घडला. गमंत म्हणजे, हा धुलाई कार्यक्रम नगरच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी विरोधकांसाठी नव्हे, तर आप-आपल्यातच आयोजित केला होता. तो ही नगरच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याच्या खुशीत!! याला शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांचीही उपस्थिती असल्याची चर्चा आहे. आता कोरगावकर नगरच्या ज्या पॅराडाईज हॉटेलमध्ये उपस्थित होते, त्याच हॉटेलच्या प्रांगणात शिवसैनिकांत सुरू असलेल्या या धुलाई कार्यक्रमापासून कसे अनभिज्ञ असू शकतात? मात्र त्यांनी सपशेल कानावर हात ठेवत, असे काही मोठे घडलेच नाही, आणि हा शिवसेनाविरुद्ध मीडियाचा डाव असू शकतो, असा आरोप केला आहे.

स्वर्गीय राठोड यांना अपशब्द वापरल्याने राडा -

नगर शहरावर तब्बल 25-30 वर्षे एकहाती सत्ता राखलेले माजी आमदार अनिल राठोड यांनाच काही नगरसेवक, कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरले आणि हा राडा झाल्याचे बोलले जाते. त्याला पार पडलेल्या महापौर पदाच्या उमेदवारीची किनार पण आहे. राठोड गटाच्या रिता भाकरे यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यासाठी त्यांचे दीर निलेश भाकरे यांनी प्रयत्न केले होते, पण त्यात त्यांना यश आले नाही. राठोड यांच्या निधनाने विरोधी गट प्रबळ झाल्याचे बोलले जाते. या गटाच्या रोहिणी शेंडगे यांना पक्षप्रमुखांनी उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीच्या सोबतीने त्या महापौर झाल्या. मात्र, भाकरे यांनी उमेदवारीवर विरोध केला, म्हणून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि अंगावरील सोन्याची लूटमार झाल्याची तक्रार शिवसेना नगरसेविका रिता भाकरे यांच्या दिराने करत, मारहाण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

महापौर - उपमहापौरांची झाली औपचारिक घोषणा -

दरम्यान आज प्रत्यक्ष मतदान होणार होते, मात्र शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार रोहिणी शेंडगे आणि उपमहापौर पदाचे राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्राप्त अर्जांची छाननी करून या दोघांना विजयी घोषित केले. निवडी नंतर नवीन विकासकामे करूच, पण तत्पुर्वी प्रलंबित योजना पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असे दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अखेर काँग्रेस बेदखलच -

काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवत शिवसेना - राष्ट्रवादीचे महापौर आणि उपमहापौर झाले आहेत. विशेष म्हणजे, भाजपकडे अनुसूचित जाती - जमाती महिला प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने त्यांची मोठी गोची झाली. त्यात काँग्रेस पक्षाने आपली तलवार म्यान केल्याने महापालिकेत प्रथमच दोन्ही पदे बिनविरोध झाली आहेत. मात्र, शिवसेना अंतर्गत राड्याने या आनंदावर विरजण पडले असून भविष्यात विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत दुफळी शिवसेनेला अडचणीत आणू शकते. तर, नाराज काँग्रेस आणि विरोधातील भाजप यात तेल ओतू शकते, अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा - अहमदनगर शिवसेनेत राडा! संपर्कप्रमुखांसह नगरसेवकांना मारहाण, नगरसेविकेच्या दिराची तक्रार

Last Updated : Jun 30, 2021, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.