ETV Bharat / state

कोपरगावातील बचतगटाशी जोडलेल़्या महिलांनी बनवले  मास्क, तब्बल 10 लाखांच्यावर उलाढाल - महिला बचत गट शिर्डी

नगर जिल्ह्यातील 40 बचत गटाच्या 350 महिलांनी 1 लाखाच्या वर मास्कची निर्मिती केली असून त्या विक्रीतून किमान 15 लाखांच्यावर उत्पन्न मिळवले आहे.

shirdi women self help group stiching mask
कोपरगावातील बचतगटाशी जोडलेल़्या महिलांची मास्क बनवून तब्बल दहा लाखांच्यावर उलाढाल
author img

By

Published : Apr 23, 2020, 7:50 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोरोऩामुळे आता मास्क घालण्याची सक्ती करण़्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिवणकाम करणाऱ्या बचतगटाशी जोडलेल्या महिलांनी तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल केली आहे.

shirdi women self help group stiching mask
कोपरगावातील बचतगटाशी जोडलेल़्या महिलांची मास्क बनवून तब्बल दहा लाखांच्यावर उलाढाल

लॉकडाऊनच्या काळात सर्वच थांबले आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मास्कची मागणी वाढली आहे. पूर्वी केवळ डॉक्टर वापरत असलेले सर्जीकल मास्कही कमी पडू लागल्याने सुती कपड्यापासून मास्क बनविण्यास सुरुवात झाली. याचा सर्वाधिक फायदा बचतगचांशी जोडल्या गेलेल्या शिवणकाम करणाऱ्या महिलांना झाला आहे. काहींनी तर आपल्या कुवतीप्रमाणे मास्कचे उत्पादन करत ती मोफतही वाटली, तर काही बचत गटांकडे मास्कची मागणी होऊ लागली. त्यानंतर कापड उपलब्ध करत या महिलांनी मास्क बनविण्यास सुरुवात केली. कापडी मास्क हा स्वस्त आणि व्यवस्थित धुऊन पुन्हा वापरता येत असल्याने त्याची मोठी मागणी आहे. यामुळे या महिलांना दररोज दोनशे ते तीनशे रुपये मिळत आहेत.

मंगल वाघे, कोपरगाव

नगर जिल्ह्यातील 40 बचत गटाच्या 350 महिलांनी 1 लाखाच्या वर मास्कची निर्मिती केली असून त्या विक्रीतून किमान 15 लाखांच्यावर उत्पन्न मिळवले आहे. कोपरगावच्या संजीवनी रेडीमेड क्लस्टरच्याद्वारेही महिला मास्क बनवत आहेत. तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायतीने पुढे येऊन गावातील प्रत्येक घरात मास्क वाटण्याचा उपक्रम राबविला आहे. कोपरगावातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या मालाची सरकारने खरेदी करावी, अशी मागणी आता होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.