ETV Bharat / state

Saibaba Sansthan : भाविकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी साईबाबा संस्थानने केल्या उपाययोजना

भाविकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भाविकांना दिलासा दिला आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे आता उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप टाकण्यात आले आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यावस्था देखील करण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Apr 19, 2023, 7:38 PM IST

साईबाब संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांची प्रतिक्रिया

शिर्डी : शिर्डीत साईबाबा संस्थानने भाविकांचा उन्हापासून बचावासाठी उपाय योजना करण्यास सुरवात केली आहे. शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात सावलीसाठी मंडप उभारण्यात आला आहे. तसेच भाविकांच्या पायाला चटके बसू नये यासाठी मॅट टाकण्यात आल्या आहेत, अशी माहिती साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.

साई भक्तांना उन्हापासून दिलासा : यावर्षीच्या कडक उन्हाळा सर्वांनाच नको नको झाला आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मंदिर परिसरात संस्थानाने विविध उपाय योजना केल्या आहेत. भाविकांना मंदिरात जाताना पादत्राणे बाहेर काढून जावे लागत असल्याने मंदिर परिसरात साई संस्थानच्या वतीने ठीक-ठिकाणी मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच पायाला चटके बसू नये म्हणून कारपेट टाकण्यात आले आहे. त्यामुळे भक्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

भाविकांचे उन्हापासून संरक्षण : यावर्षीचा उन्हाळा प्रत्येक वर्षापेक्षा जास्तच जाणवत आहे. मात्र, तरीही सुट्यांच्या निमित्ताने भाविक, पर्यटक बाहेर निघताना दिसत आहेत. शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्या काहीशी रोडावली असली तरी, जे भाविक शिर्डीला येता त्यांंना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी साईबाबा संस्थानने काही उपाय योजना केल्या आहेत. उन्हापासून बचावासाठी साई मंदिर परिसरात पांढऱ्या रंगाच्या कापडाचे मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच फरशीवर कारपेट टाकण्यात आले आहे. त्यामुळे साई भक्तांचा कडाक्याच्या उन्हापासून बचाव होणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते, त्यामुळे साई भक्तांना तापमान वाढीचा सामना करावा लागतो. म्हणून संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.

शिर्डीत तापमानात वाढ : शिर्डीत तापमानात वाढ झाल्याने मंदिर परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यावस्था मंदिर प्रशासनाने केली आहे. या सोबतच दर्शन रांगेत गरमीपासून संरक्षण मिळण्यासाठी कुलरसह पंख्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानने केलेल्या उपाय योजनामुळे भाविकांना दिलासा मिळत असून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Vidarbha Weather : पुढील पाच दिवस विदर्भात अवकाळी पाऊस, गारपिटीची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.