शिर्डी (अहमदनगर) - वडिलांबरोबर वैद्यकीय तपासणीसाठी साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयांमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीला रुग्णालयातील डाॅक्टरांनी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने शिर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी संबंधित डॉक्टर विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत (POSCO) गुन्हा दाखल केला असून डॉ. वैभव तांबेला अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार करतना डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल - शिर्डी गुन्हा बातमी
रविवारी शिर्डी शहरातील अल्पवयीन मुलीस श्वसनाचा अचानक त्रास जाणवू लागल्याने तिच्या वडिलांनी तिला साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कॅज्युलिटी विभागात तपासणीसाठी नेले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरने मुलीची तपासणी करत असताना बॅड टच केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार करतना डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग