ETV Bharat / state

अपुऱ्या सुविधांमुळे शिर्डी विमानतळावर तांत्रिक अडचणी - Shirdi International Airport news

2018 पासून शिर्डीतील विमानसेवेला सुरुवात झाली होती. उद्घाटन सोहळ्यात दोन महिन्यांत नाईट लँडींगसह सर्व सुविधा पूर्ण करण्याची ग्वाही महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली होती. त्यानंतर दोन वर्ष उलटूनही नाईट लँडींग सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. यामुळे विमानांना व्हिजिबिलिटीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिर्डी विमानतळ
शिर्डी विमानतळ
author img

By

Published : Feb 11, 2020, 7:00 PM IST

अहमदनगर: देश-विदेशातील साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले. मात्र, या विमानतळवर लँडींग आणि टेकऑफसाठी लागणारी उच्च दर्जाची यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित नसल्याने अडचणी येत आहेत.

अपुऱ्या सुविधांमुळे शिर्डी विमानतळावर तांत्रिक अडचणी

2018 पासून शिर्डीतील विमानसेवेला सुरुवात झाली होती. उद्घाटन सोहळ्यात दोन महिन्यांत नाईट लँडींगसह सर्व सुविधा पूर्ण करण्याची ग्वाही महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली होती. त्यानंतर दोन वर्ष उलटूनही नाईटलँडींग सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. यामुळे विमानांना व्हिजिबिलिटीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा - भारतीय लष्कराच्या कारवाईत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा!

धुके किंवा खराब वातावरण असल्यास विमान कंपन्यांना अचानकपणे विमानांचे लँडींग दुसरीकडे करावे लागत असल्याचे प्रकार वारंवार होत आहेत. यामुळे विमान कंपन्या आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांसाठी टर्मिनल इमारत सुध्दा कमी पडत आहे. त्यामुळे त्याचे विस्तारीकरण लवकरात लवकर होण्याची गरज आहे.

शिर्डी विमानतळाला देशभरातून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, इंदुर या ठिकाणांहून शिर्डीत दररोज अठ्ठावीस विमानांची ये-जा होते. मुंबई, पुणे, नागपूरनंतर शिर्डी विमानतळ चौथ्या स्थानावर आहे. असे असतानाही शिर्डी विमानतळाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.

नाशिक येथील विभागीय बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळावरील नाईट लँडींग आणि टर्मिनल इमारतीच्या कामाला पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, त्याची पूर्तता झालेली नाही.

Intro:

ANCHOR_ देश विदेशातील साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी येथे राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने उभारलेल्या शिर्डी येथील साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडींग आणि टेकअपसाठी उच्चत्तम दर्जाची यंत्रणा पुर्णपणे कार्यान्वीत नसल्याने अडचणी आहे,त्याच बरोबरीने नाव आंतरराष्ट्रीय असल तरी सुविधात्या कमतरते मुळे हे विमानतळ खरेच कधी आंतरराष्ट्रीय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय....

VO_ देशाच्या राष्टपतींच्या हस्ते शिर्डी विमानतळाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून म्हणजे 2018 पासून शिर्डी विमानसेवेला सुरुवात झाली होती. उद्घाटन सोहळ्यात दोन महिन्यांत नाईट लँडींगसह सर्व सुविधा पूर्ण करण्याची ग्वाही महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली होती. त्यानंतर दोन वर्षे लोटूनही अद्याप नाईटलँडींग सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाहीये या मुळे व्हीजीबीलीटीच्या अडचणींचा सामना विमानांना करावा लागत आहे. धुके अथवा खराब वातावरणाने विमान कंपन्यांना अचानकपणे विमानांचे लँडींग दुसरीकडे करावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या असल्याने विमान कंपन्यांप्रमाणे विमान प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय याच बरोबरीने प्रवाशांसाठी टर्मीनल इमारत सुध्दा अद्ययावत नाहीये ती कमी पडतेय त्यांच विस्तारीकरण लवकर होण्याची गरज आहे....

BITE_ दीपक शात्री संचालक शिर्डी विमानतळ

VO_शिर्डी विमानतळावर देशभरातुन प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय सध्या दिल्ली, बेंगळुरू, हैद्राबाद, चेन्नई, इंदोर आदी ठिकाणांहून शिर्डीत दररोज अठ्ठावीस विमानांची येजा होतेय. मुंबई, पुणे, नागपूर नंतर शिर्डी एअरपोर्ट चौथ्या स्थानावर असताना शिर्डी एअरपोर्टकडे सरकारने दुर्लक्ष न करता तातडीने प्रलंबीत कामे पुर्ण करण्याची गरज आहे...नाशिक येथील विभागीय बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळावरील नाईट लँडींग आणि टर्मीनल इमारतीच्या कामाला पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी घोषणा केली असली तरी ती तातडीने न केली गेल्यास देश-विदेशातुन शिर्डीला येणार्या साईभक्तांना विमानाने शिर्डीला येण सुखकर होणार नाहीये....Body:mh_ahm_shirdi_ airport problem_11_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_ airport problem_11_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.